JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: संत्री सोलताच आतमध्ये दिसलं अतिशय अजब दृश्य; पाहून नेटकरीही शॉक

VIDEO: संत्री सोलताच आतमध्ये दिसलं अतिशय अजब दृश्य; पाहून नेटकरीही शॉक

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Weird Viral Video) एका व्यक्तीच्या हातात संत्री दिसते. संत्री सोलल्यानंतर याच्या आतमध्ये जे काही दिसतं, ते पाहून नेटकरी हैराण झाले आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 02 मार्च : जगात अनेक विचित्र आणि हैराण करणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियावर दररोज नवनवे हैराण करणारे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत राहतात. आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही हैराण व्हालच, मात्र सोबतच तुमचा डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही. हा व्हिडिओ एका संत्र्याचा आहे (Strange Video of Orange). VIDEO - इवल्याशा तोंडात जबडा धरला आणि…; एवढ्याशा बेडकाने श्वानाचे केले हाल व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Weird Viral Video) एका व्यक्तीच्या हातात संत्री दिसते. संत्री सोलल्यानंतर याच्या आतमध्ये जे काही दिसतं, ते पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. व्हिडिओ पाहून लोकांना विश्वास बसत नाहीये, की असंही होऊ शकतं. व्हिडिओमध्ये दिसतं की संत्रा सोलल्यानंतर याच्या आतमध्ये लहान लहान अनेक संत्रा दिसू लागतात. या आतील संत्र्यांवरही साल असते. हे पाहून इंटरनेट यूजर्सही थक्क झाले.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एका व्यक्तीने आपल्या हातामध्ये संत्री घेतलेली आहे. सहसा लोक ज्या पद्धतीने संत्री सोलतात तसंच हा व्यक्तीही संत्री सोलू लागतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की सर्वात आधी हा व्यक्ती संत्र्याचे दोन भाग करतो. यादरम्यान त्याला हैराण करणारं दृश्य दिसतं. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की हा व्यक्ती संत्री सोलत असतानाच आतमध्ये त्याला अनेक छोट्या संत्र्या दिसतात.

Yuck! उंटाजवळ जात व्यक्तीचं किळसवाणं कृत्य; VIDEO पाहूनच उलटी येईल

तुम्ही पाहू शकता की या एका मोठ्या संत्र्याच्या आतमध्ये सात ते आठ लहान लहान संत्र्या आहेत. ज्या नॉर्मल संत्र्यांप्रमाणेच आहेत, त्यावर सालही आहे. हे पाहून संत्री सोलणारा व्यक्तीही हैराण होतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर rising.tech नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. सोशल मीडियावर काही यूजर्सनी याला प्रेग्नंट संत्रा म्हटलं आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. आतापर्यंत अडीच मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या