मुंबई, 30 मार्च : इटुकली पिटुकली खारूताई तर तुम्हाला माहितीच आहे. खारीचं नाव घेतलं की झाडावर सरसर चढणारी, लुटूलुटू पळणारी, काहीतरी खाणारी खारच डोळ्यासमोर येते. पण पहिल्यांदाच ही छोटीशी खार असं काही करताना दिसली जे पाहून तुम्हाला धक्काच बसेल. किंबहुना तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही (Squirrel Shocking Video). खारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या खारीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तसं खारीला पाहिलं की तिला पाहतच राहवंसं वाटतं. ती पळताना, खाताना, झाडावर चढताना खूप क्युट दिसते. पण या व्हिडीओत मात्र खारीचं असं रूप दिसलं आहे, जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल. खारही असं काही करू शकते, याचंच आश्चर्य तुम्हाला वाटेल. हे वाचा - क्या बात है! प्राण्यांवरही चढला Pushpa चा फिव्हर; चिम्पाझीने मारली Allu arjun ची स्टाईल; पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक खार काहीतरी खाताना दिसते आहे. ती दुसरं तिसरं काही नाही तर ती चक्क एक जिवंत पाल खाते आहे (Squirrel eat live lizard). सामान्यपणे खारूताई बदाम, अक्रोड, फळं खाताना पाहिलं असेल. पण असं काहीतरी खाताना पहिल्यांदाच पाहिलं असावं. कदाचित जास्त भूक लागली तर खार मांसही खात असावी, हेच या व्हिडीओतून दिसून येत आहे.
खार सुरुवातीला पालीची शेपटी, त्यानंतर तिचा पाय आणि तोंडही चावते. त्यानंतर काय कुणास ठाऊक तिच्या मनात काय येतं. ती पालीला खात नाही तिला तशीच सोडून देते. सुरुवातीला पालही मृत वाटते. पण जशी खार तिला सोडते तशी ती पाल तडफडताना दिसते आणि ती जिवंत असल्याचं स्पष्ट होतं. हे वाचा - OMG! हे मांजर आहे की… करतब पाहून नेटिझन्स थक्क; असं काय केलं VIDEO मध्येच पाहा naturegoesmetal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.