JOIN US
मराठी बातम्या / Viral / खतरनाक! चिमुकलीच्या हातातील खेळणं पाहून भल्याभल्यांना फुटला घाम; असं आहे तरी काय पाहा VIDEO

खतरनाक! चिमुकलीच्या हातातील खेळणं पाहून भल्याभल्यांना फुटला घाम; असं आहे तरी काय पाहा VIDEO

मुलगी अशा एका गोष्टीसोबत खेळताना दिसली जे पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

जाहिरात

चिमुकलीचा खेळ पाहून सर्वजण हैराण.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट : लहान मुलं (Children playing) कधी, काय आणि कशासोबत खेळतील सांगू शकत नाही. त्यांच्या हाती जी वस्तू लागेल ती त्यांच्यासाठी खेळणंच असते. अशीच एक चिमुकली अशा खेळण्यासोबत खेळताना दिसली जे पाहून भल्याभल्यांना घाम फुटला. लहान मुलीच्या हातातील खेळणं पाहून अनेकांना भीती वाटली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. लहान मुलांना काय हानिकारक आहे ते समजत नाही. त्यांच्यासाठी सर्वकाही नवीन असतं. काही तरी नवीन दिसतं म्हणून उत्सुकतेपोटी मुलं ते आपल्या हातात घेतात, त्याच्याशी खेळतात किंवा अगदी तोंडातही टाकतात. त्यांना यामुळे आपल्याला काहीतरी होईल याची मुळीच भीती वाटत नाही. कारण ते हानिकारक, धोकादायक ठरू शकतं. हे वाचा -  VIDEO - चारही बाजूंनी ‘मृत्यू’ने घेरलं! मगरींचं साम्राज्य असलेल्या नदीत चिमुकल्याची आयुष्यासाठी झुंज Best Videos ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला जमिनीवर मोठा कोळी चालताना दिसत आहे. एक नाही तर दोन कोळी आहेत. त्यानंतर एक चिमुकली या कोळ्याजवळ येते आणि त्याला हाताने उचलते. त्यानंतर एक कोळी तिच्या पाठीवर आणि एक हातावर दिसतो. तरुणाच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती दिसत नाही. उलट ती हसताना दिसते आहे.

संबंधित बातम्या

तसे कोळी आपण नेहमी पाहतो. आपल्या घरातील कोपऱ्यात कोळी दिसतात. पण या व्हिडीओत जितका मोठा कोळी आहे तसे कोळी आपण प्रत्यक्षात पाहिलेले नाहीत. पण काही ठिकाणी असे कोळी दिसून येतात. छोट्या कोळ्यांमुळे आपल्याला काही धोका नसतो पण हे मोठे कोळी खतरनाक आणि विषारी असतात. पण अशाच कोळ्यांसोबत ही मुलगी खेळताना दिसत आहेत आणि कोळीही तिला काही करताना दिसत नाही. कदाचित हे कोळी पाळीव असावेत. हे वाचा -  VIDEO - फुंक मारताच ‘खेळ खल्लास’; लाइव्ह टीव्ही शोदरम्यान घडली भयंकर दुर्घटना या चिमुकलीला स्पायडर गर्ल असं म्हणण्यात आलं आहे. नेटिझन्सनी मुलीच्या या खेळाला खतरनाक म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या