नवी दिल्ली 25 डिसेंबर : वन्यजीवांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर केले जातात. या व्हिडिओला व्ह्यूज आणि लाईकही भरपूर मिळतात. कारण प्राण्यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मजेदार आणि अनोखं अनेकदा पाहायला मिळतं. त्यामुळे हे व्हिडिओ लोकांचं भरपूर मनोरंजन करतात. पण बर्याचदा काही असे व्हिडिओ समोर येतात, जे पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. नाताळची तयारी सुरू असताना ख्रिसमस ट्रीवर आढळला जहाल विषारी साप; पाहताच कुटुंबाची उडाली घाबरगुंडी व्हायरल व्हिडिओमध्ये एक साप, मांजर आणि बेडूक दिसत आहेत. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे शिकारीच स्वतःच्या भक्ष्याच्या जाळ्यात अडकून स्वतःची ताकद विसरून गेला आहे. साप, मांजर आणि बेडूक हे सर्व आपापल्या ठिकाणी हुशार प्राणी आहेत, मात्र या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या परिस्थितीत कोणाची हुशारी कामी येईल हे सांगणं कठीण आहे. खरंतर सापाला पाहून भल्याभल्यांना घाम घुटतो, मात्र दोन दुश्मनांच्या मध्ये अडकल्याने साप यात आपलीच ताकद विसरल्याचं दिसतं.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सापाला पाहून बेडूक सापाची शेपटी तोंडाने दाबतो आणि आरामात बसतो. साप स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र यादरम्यान सापाच्या समोर एक मांजरही येते. बेडकाच्या तोंडात असूनही साप हिंमत हारत नाही आणि प्रत्युत्तर देत राहतो. व्हिडीओमध्ये नेमकं कोणाची हार होते हे समजत नाही. मात्र, एक लहान मुलगा शेजारीच बसून या भयानक दृश्याचा आनंद घेताना दिसतो. पाठलाग करत कांगारूचा व्यक्तीवर जबर हल्ला; हैराण करणारा Video Viral ट्विटरवर @weirdterrifying नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 8 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 16 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.