JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking! एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये अचानक निघाला साप; पाहताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ अन्...

Shocking! एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये अचानक निघाला साप; पाहताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ अन्...

तुम्ही विमानाने प्रवास करत असाल आणि त्या विमानामध्ये साप असल्यास तुमची काय अवस्था होईल? अशीच एक घटना दुबई विमानतळावर पाहायला मिळाली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तिरुअनंतपुरम 11 डिसेंबर : सापाचं नाव घेताच अनेकांची झोप उडते. साप समोर आल्यावर तर लोकांची काय अवस्था होते, हे तुम्हालाही माहितीच असेल. मात्र, जक तुम्ही विमानाने प्रवास करत असाल आणि त्या विमानामध्ये साप असल्यास तुमची काय अवस्था होईल? अशीच एक घटना दुबई विमानतळावर पाहायला मिळाली. यात एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान केरळहून दुबई विमानतळावर पोहोचलं. यादरम्यान फ्लाइटच्या कार्गो होल्डमध्ये एक साप बसलेला आढळून आला. याला म्हणतात नशीब! एका रात्रीत गावातील 165 लोक झाले करोडपती, नेमकं काय घडलं? हे पाहून विमान कर्मचाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली. विमान वाहतूक नियामक DGCA ने आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान शनिवारी केरळहून दुबई विमानतळावर पोहोचलं. कर्मचार्‍यांनी कार्गो होल्ड पाहताच यात त्यांना साप दिसला. मात्र, विमानात उपस्थित असलेल्या कोणत्याही प्रवाशाला कोणतीही हानी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. साप पाहिल्यानंतर विमान कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान केरळमधून दुबईला निघालं होतं. दुबई विमानतळावरील विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचं सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली असता तिथे एक साप दिसला. सापाला पाहताच कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवाशांनाही आश्चर्य वाटलं. यानंतर कर्मचाऱ्यांनी समजावून प्रवाशांना शांत केलं. त्यानंतर ही बाब अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या विमानतळ कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढलं. त्यानंतर सापाला बाहेर काढण्यात आलं. ट्रान्सवुमन शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकलं; उत्तर प्रदेशातील खासगी शाळेतील प्रकार यानंतर आता डीजीसीएने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याआधी नेपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे टायर पंक्चर झाले होते. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, दुबई विमानतळावरील फ्लाइटच्या कार्गो होल्डमध्ये साप सापडला होता. सध्या यामागे ग्राउंड लेव्हलवर झालेली चूक कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या