JOIN US
मराठी बातम्या / Viral / तोंडात धरला हात आणि काही सेकंदातच व्यक्ती...; सापाच्या हल्ल्याचा भयानक VIDEO VIRAL

तोंडात धरला हात आणि काही सेकंदातच व्यक्ती...; सापाच्या हल्ल्याचा भयानक VIDEO VIRAL

सापाला पकडणाऱ्या व्यक्तीवर सापाने केला भयानक हल्ला.

जाहिरात

सापाने केला व्यक्तीवर हल्ला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 ऑगस्ट :  सापाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एखाद्याला सापापासून वाचवणं असो, साप पकडणं असो किंवा अगदी सापांसोबत खेळतानाही काही लोक दिसतात. पण साप तो सापच. स्वभावानुसार तो खतरनाकच. कधी, कसा हल्ला करेल सांगू शकत नाही. सापाच्या अशाच हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. काही लोकांना सापासारखा खतरनाक प्राणीही खेळणं वाटतं. अगदी बिनधास्तपणे ते सापाला पकडायला जातात. असाच प्रयत्न एका व्यक्तीने केला. पण साप इतका चवताळला की त्याने त्या व्यक्तीवर भयानक हल्ला केला. सापाच्या हल्ल्यात व्यक्तीची जी अवस्था झाली ती पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता एक काळा साप जमिनीवर पळताना दिसतो आहे. साप इतका खतरनाक आहे की पाहूनच घाम फुटतो. एक व्यक्ती या सापाला पकडण्याचा प्रयत्न करते. स्वतःची कोणतीही काळजी न घेता ती हातांनी या सापाला धरते. सापाच्या मध्यभागी पकडते तसा साप चवताळतो. संतप्त साप या व्यक्तीवर हल्ला करतो. हे वाचा -  OMG! भुकेल्या सापाने दुसऱ्या सापाला जिवंत गिळलं पण…; शेवटी जे घडलं ते आणखी धक्कादायक; Watch Video जशी ही व्यक्ती सापाला हातात धरून उचलते तसा साप आपलं तोंड मागे फिरवून त्या व्यक्तीचा हात आपल्या तोंडात घेतो. व्यक्ती लगेच त्या सापाला हातातून खाली फेकते. त्यावेळी त्या व्यक्तीचा हाताला सापाने दंश केल्याचं दिसतं.

संबंधित बातम्या

तरी ही व्यक्ती थांबत नाही ती पुन्हा त्या सापाला धरायला जाते. सापही पुन्हा हवेत उडत त्या व्यक्तीवर हल्ला करते. यावेळीही साप हातांवरच वार करतो. अवघ्या काही सेकंदातच तब्बल तीन वेळा या व्हिडीओत साप त्या व्यक्तीला दंश करतो. व्यक्तीच्या हातातून रक्त येताना दिसतं. हे वाचा -  OMG! सरपटणारा सापही चालू लागला; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO @world_of_snakes इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या