मुंबई, 23 ऑगस्ट : प्रत्येक लहान मुलामध्ये एक काही ना काही करण्याची जिद्द असते बऱ्याचदा तो प्रयोग यशस्वी होतो असं नाही पण त्याला योग्य दिशा मिळाली तर त्याच्या जिद्दीचं सोनं होतं. अशाच एका छोट्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाला ड्राम वाजवण्याची आवड आहे. प्रत्येक गाणं लागलं की त्यावर हातात असेल त्यातून धून निर्माण करण्यासाठी धडपडतो. ड्राम स्टीक आणि प्लायवूडचा तुकडा एवढ्या दोन गोष्टींमधून या मुलानं संपूर्ण गाण्यावर छान संगीत तयार केलं आहे. या मुलाचं कौशल्य आणि वयं पाहून सर्वच जण आश्चर्यचकीत झाली. इतक्या लहान वयात प्रत्येक बीट पकडून इतकं सुंदर संगीत वाजवणाऱ्या या चिमुकल्याचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. त्याच्या संगीताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हे वाचा- …आणि बघता बघता अख्खा डोंगर खचला, पाहा थरारक LIVE VIDEO
हा व्हिडीओ आतापर्यंत 1.4 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 8 हजाहून अधिक लाइक आणि रिट्वीट देखिल करण्यात आले आहेत. अनेकांनी या चिमुकल्याच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी हा चिमुकला ड्राम वाजवण्याचे कामही करतो असंही म्हटलं आहे. इतक्या लहान वयात ताल आणि सूरांची योग्य जाण आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं हा चिमुकला वाजवत आहे हे पाहून अनेकांनी कौतुकाचा वर्षावर केला आहे. या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.