JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking Video : अमेरिकेत पावसाचा हाहाकार; भिंत तोडून पुराचं पाणी शिरलं घरात, थोडक्यात बचावला तरुण

Shocking Video : अमेरिकेत पावसाचा हाहाकार; भिंत तोडून पुराचं पाणी शिरलं घरात, थोडक्यात बचावला तरुण

एक तरूण घरात फेऱ्या मारत होता..काही क्षणाचा जरी विलंब झाला असता तर त्याचा जीव गेला असता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 4 सप्टेंबर : अमेरिकेतील (America) अनेक भागात पावसामुळे ( Heavy Rain) मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी जमा झाले आहेत. तर काहीच्या गाड्या बुडाल्या आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (VideoViral) होत आहे. या व्हिडीओमध्ये घराच्या बेसमेंटमध्ये पुराचं पाणी शिरलं असून यामुळे कुटुंबीय अडकल्याचं दिसत आहे. ही घटना न्यूजर्सीची असल्याचं समोर आलं आहे. जेनिकाने सांगितलं की, त्याच्या मुलासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. पहिल्यांदा पावसाचं पाणी घरात आलं, त्यानंतर घराचं दार कोसळलं आणि पाण्याचा वेग वाढला. यामध्ये घरातील वस्तू वाहताना दिसत आहे. सुदैवाने यात त्याच्या मुलाचा जीव वाचला आहे. तो शिड्यांवरुन वरच्या मजल्यावर गेला होता. त्याला जरा तरी उशीर झाला असता तर त्याच्या जीवावर बेतलं असतं. पाण्याचा वेग इतका जास्त होता की, वाहून गेला असता.

संबंधित बातम्या

हे ही वाचा- खतरनाक! उंच कड्यावरून झेपावत हवेत साधला डाव; कधीच पाहिला नसेल शिकारीचा असा VIDEO हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकजणं यामागे क्लायमेट चेंजचं कारण सांगत आहेत. यानंतर तातडीने या कुटुंबाला रेस्क्यू करण्यात आलं. इतकं पाणी भरल्यानंतर घराच्या खिडक्या तोडून त्यांना मदत मागावी लागली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या