JOIN US
मराठी बातम्या / Viral / दहा-पंधरा नाही, एका छोट्या रिक्षातून चक्क ५० लोकांचा प्रवास, अखेर...

दहा-पंधरा नाही, एका छोट्या रिक्षातून चक्क ५० लोकांचा प्रवास, अखेर...

शेअरींग संदर्भात सोशल मीडियावर असे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जे पाहून तुम्हाला स्वत:ला विश्वास बसणार नाही.

जाहिरात

व्हायरल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 डिसेंबर : आपण पाहिलं असेल भारतात अनेक ठिकाणी शेअरींगने प्रवास केला जातो. म्हणजेच तुम्हाला कुठे जायचं असेल तर ऑटो किंवा टॅक्सिसाठी प्रत्येक सिटचे पैसे देऊन प्रवास केला जातो. त्यावेळेला कधीकधी हे शेअर वाहन चालक प्रवाशांचं ओव्हर लोडिंग करतात. एकमेकांच्या मांडिवर बसवून त्यांना नेतात. हे तुम्ही पाहिलंच असेल. हे शहरात देखील होतं. पण ग्रामिण भागात हे मोठ्या प्रमाणात होतं. कारण तेथे प्रवासासाठी कमी पर्याय उपलब्ध असतात. पण या शेअरींग संदर्भात सोशल मीडियावर असे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जे पाहून तुम्हाला स्वत:ला विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ पाहून पोलीस देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. हे ही पाहा : चालत्या कारवर अचानक पडली वीज, पुढे जे घडलं ते आश्चर्यचकीत करणारं, पाहा Video एका ऑटो चालकाने दहा-पंधरा नाही तर चक्क पन्नास प्रवाशांना घेऊन प्रवास केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. वास्तविक, ही घटना मध्य प्रदेशातील अलीराजपूरची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वीचा आहे जो आता व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात जत्रा पाहून काही लोक परतत होते, त्याचवेळी ही घटना घडली. दुसरी गाडी उपलब्ध नसल्यामुळे आणि काही पैशांसाठी या ऑटोचालकाने ५० लोकांना घेऊन धोकादायक प्रवास केला. हा व्हिडीओ ऑक्टोबर महिन्यांचा असल्याचे खुद्द पोलिसांनीच सांगितले आहे. हे सर्व लोक परत येताना एकाच ऑटोत बसले, त्यांची संख्या पन्नास होती. हा व्हिडीओ अलीराजपूर जिल्ह्यातील जोबतचा आहे. हा भाग अतिशय मागासलेला मानला जातो. येथे अलीराजपूर शहरातून किंवा दूरच्या भागातून ग्रामस्थ येतात तेव्हा त्या बाजूने एक-दोन वाहने येतात. त्यामुळे इतक्या लोकांना आणायचा भार ठराविक २ ते ३ गाड्यांवर असतो. त्यामुळेच लोक अशा पद्धतीने धक्कादायक प्रवास करतात.

या व्हिडीओमध्ये प्रवासी वरपासून खालपर्यंत भरलेले दिसत आहेत. घरी परतण्यासाठी हताश झालेले लोक जिथे जागा मिळेल तिथे लटकले. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ऑटोच्या नंबर प्लेटवरून तो ऑटोला शोधून त्याला जप्त करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या