प्रतिकात्मक फोटो
मुंबई 7 नोव्हेंबर : भारतातील राजस्थानमधील एका गावाबद्दल अशी बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाल धक्का बसले आणि सगळा प्रकार भारतात घडला. यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. भारताच्या राजस्थान राज्यातील बुंदी जिल्ह्यातील तीन गावांमध्ये असे काही नियम आहेत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे तुघलकी फर्मान या ३ गावांतील पंच-पटेलांनी कथन केले आहे. या अंतर्गत कंजर समाजातील मुलींच्या विवाहावर बंदी घालण्यात आली आहे. येथील पंच गावात राहणाऱ्या मुलींना लग्न करू देत नाहीत आणि लग्न लावल्यास लाखोंचा दंडही ठोठावतात. हे करण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये द्यावे लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, येथील पंच-पटेल किंवा मोठी लोक कंजर समाजातील मुलींना शरीर व्यवसाय करण्यास भाग पाडतात. पंचांच्या मनमानीमुळे येथील मुली काही रुपयांसाठी वेश्याव्यवसाय करतात, असे सांगितले जाते. त्याचवेळी या मुलींना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी रेणू जयपाल यांनी ऑपरेशन अस्मिता सुरू केली आहे. हे ही वाचा : Fact About Tip : रेस्टॉरंटमध्ये TIP का देतात, याची सुरूवात केव्हा पासून झाली? बुंदीची ही तीन गावे बुंदी जिल्ह्यातील दाबलाना शंकरपुरा, रामनगर आणि इंदरगढ मोहनपुरा या तीन गावांमध्ये कंजार समाजाचे लोक राहतात. इथल्या मुलींना काही रुपयांसाठी शरीर विकावं लागतं, कारण इथल्या पंचांसमोर त्यांचं काहीही चालत नाहीत, त्यामुळे ते जे सांगतील तेच करावं लागतं. परंतू नंतर दुष्कृत्य जिल्हाधिकारी रेणू जयपाल यांनी ऑपरेशन अस्मिता सुरू केली आहे. त्यानंतर येथील मुलींची लग्ने होऊ लागली असून अशा पंचांवर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकारी रेणू जयपाल यांनी येथील मुली आणि महिलांसाठी ऑपरेशन अस्मिता राबवून त्यांच्या विवाहाची सुरुवात केली. हे ही वाचा : मोबाईल चोरून पळाला चोर, पण दुसऱ्याच क्षणी घडलं असं काही की मिळालं ‘कर्माचं फळ’ त्याअंतर्गत येथील मुलींचे लग्न प्रशासनाच्या उपस्थितीत पार पडले. याशिवाय प्रशासन प्रत्येक लग्नासोबत सामूहिक विवाहही आयोजित करते, जेणेकरून अनेक मुलींना या सगळ्यातून एकत्र बाहेर काढता येईल.