JOIN US
मराठी बातम्या / Viral / ''मला अजून जगायचय....'' असं हातावर लिहित महिलनं घेतला टोकाचा निर्णय, नक्की असं काय घडलं?

''मला अजून जगायचय....'' असं हातावर लिहित महिलनं घेतला टोकाचा निर्णय, नक्की असं काय घडलं?

आयुष्य संपवण्यापूर्वी महिलेने स्वतःच्या हातावर नोट लिहून ठेवली होती, जी पाहून लोक आश्चर्यचकित झाले.

जाहिरात

महिलेनं हातावर लिहिलेली नोट

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 जानेवारी : गुजरातमधील सूरतमध्ये एका महिलेने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यात आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं जे केलं ते खरंच खूप धक्कादायक आहे. यामुळेच बऱ्याच लोकांना धक्का बसला आहे. खरंतर या महिलेला अजूनही जीवन जगण्याची इच्छा होती. पण तरी देखील तिनं आत्महत्या केली. आत्महत्या करताना बरेच लोक सुसाइड नोट लिहून ठेवतात, ज्यामध्ये त्यांनी हा निर्णय का आणि कशासाठी घेतला हे सगळं लिहिलं जातं. पण या महिलेनं आपलं सुसाइड नोट ज्या पद्धतीने लिहिलंय ते धक्कादायक आहे. Video : ‘यमराज सुट्टीवर होता वाटतं?’’, झाडाखाली उभ्या असलेल्या तरुणासोबत घडलेला प्रकार पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने स्वतःच्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती, जी पाहून लोक आश्चर्यचकित झाले. महिलेने हातावर लिहिलेली आत्महत्येची कारणे थक्क करणारी आहेत. या महिलेला अजूनही आयुष्य जगायचं आहे, पण तरीही तिला स्वत:चं आयुष्य संपवावं लागलं, यापेक्षा अभाग्य ते आणखी काय? सुरतमधील या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती महिला आपल्या पतीवर खूप नाराज होती. मरण्यापूर्वी महिलेने तिच्या हातावर हिंदीत लिहिले होते, ‘मला जगायचे आहे, पण माझा नवरा मला खूप त्रास देत आहे.’ या महिलेने खोलीच्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या मृत महिलेला दोन मुलं आहेत आणि तिचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाला. आत्महत्या केलेल्या महिलेचा पती रिक्षाचालक असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंडची रहिवासी असलेली ही महिला पती प्रवीण गोस्वामीसोबत सुरतच्या लिंबायत भागात राहत होती. शेजारच्या लोकांनी महिलेला फासावर लटकलेले पाहिल्यानंतर त्यांनी 108 ला फोन करून रुग्णवाहिका बोलावली, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी महिलेच्या आत्महत्येची नोंद करून तपास सुरू केला आहे. याघटनेनंतर या महिलेच्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि पुढील तपास सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या