JOIN US
मराठी बातम्या / Viral / थेट जंगलाच्या राज्यासोबत भिडली म्हैस; या लढाईचा शेवट पाहून व्हाल शॉक, VIDEO

थेट जंगलाच्या राज्यासोबत भिडली म्हैस; या लढाईचा शेवट पाहून व्हाल शॉक, VIDEO

Lion and Buffalo Fight Video: व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की म्हशीने अनेक ठिकाणी आपल्या शिंगांनी सिंहावर हल्ला केला आहे. रक्तबंबाळ झालेला सिंह तिथेच पडून आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 18 डिसेंबर : जंगलातील नियम आणि कायदे वेगळेच असतात. इथे स्वतःची भूक भागवण्यासाठी दररोज कोणत्या ना प्राण्याची शिकार केली जाते (Wild Animals). मात्र इथे शिकारीच कधी शिकार बनेल, हेदेखील सांगता येत नाही. सोशल मीडियावर (Social Media) सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. यात दिसतं की एक म्हैस थेट सिंहासोबत भिडली आहे (Lion and Buffalo Fight Video). यानंतर सिंहाची जी अवस्था होते, त्याचा विचारही कोणी कधी केला नसेल. म्हैस आपल्या शिंगावर उचलून सिंहाला अशी अद्दल घडवते, जणू तो जंगलाचा राजा नाही तर एखादा छोटा प्राणी आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतं की आज हा सिंह कामातून गेला. मात्र, तरीही सिंह पूर्ण ताकत लावून म्हशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. तरुणाने भररस्त्यात तरुणींना करायला लावलं असं काम; VIDEO पाहून तुम्हीही शॉक व्हाल सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही सिंह आणि म्हशीच्या लढाईचे व्हिडिओ पाहिले असतील. मात्र सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ जरा वेगळा आहे. यात सिंहावर म्हशीने हल्ला केल्याचं दिसतं. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, जणू जंगलाच्या राजासमोर म्हशीने हार मानली आहे. मात्र, घायाळ होऊनही सिंह आपल्या पंजांच्या सहाय्याने म्हशीला पकडण्याचा प्रयत्न करतो.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की म्हशीने अनेक ठिकाणी आपल्या शिंगांनी सिंहावर हल्ला केला आहे. रक्तबंबाळ झालेला सिंह तिथेच पडून आहे. सिंह आता जखमी झाल्याचं समजताच म्हैस तिथून निघण्याचा प्रयत्न करते. मात्र इतक्यात सिंह झडप घालून म्हशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. बापरे! चक्क बिबट्यासोबतच फोटो काढायला गेला आणि…; सर्वात खतरनाक सेल्फीचा VIDEO हा व्हिडिओ अवघा 57 सेकंदाचा आहे. मात्र यात सिंहासमोर म्हैसच सरस ठरल्याचं पाहायला मिळतं. मात्र वर्चस्वाच्या या लढाईत विजय नेमका कोणाला मिळतो, हे समजलं नाही. हा व्हिडिओ nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 21 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. व्हिडिओ पाहून लोक म्हशीचं कौतुक कमी आणि सिंहाच्या झालेल्या अवस्थेबद्दल दुःख जास्त व्यक्त करत आहेत. यूजर्सचं म्हणणं आहे की जंगलाच्या राजाने चुकीच्या वेळी आणि चुकीच्या प्राण्यासोबत पंगा घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या