मुंबई, 1 जून- जगात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. काही ठिकाणं स्वर्गासारखी सुंदर असतात आणि तिथं माणूस क्वचितच जातो. तर काही ठिकाणं अशी असतात जिथं माणसाला सहज पोहोचणं शक्य आहे, पण माणूस तिथे जाण्याची हिंमत करत नाही. अशाच ठिकाणांपैकी एक म्हणजे इटलीतील पोवेग्लिया बेट (Poveglia Island) आहे. याला जगातलं सर्वांत भयावह बेट (World’s Most Scary Island) म्हटलं जातं. या बेटाशी (Italy’s Ghost Island) संबंधित कथा तुम्हाला थक्क करून टाकतील. गेल्या 54 वर्षांपासून हे ठिकाण पूर्णपणे बंद आहे आणि येथे पर्यटकांना ये-जा करण्यास मनाई आहे, यावरूनच याला जगातील सर्वांत भयावह बेट का म्हणतात याचा अंदाज तुम्हाला येईल. अनेकांना तर या बेटाचं नाव काढलं तरी भीती वाटते. या ठिकाणाशी संबंधित अनेक कथा-किस्से प्रसिद्ध आहेत, ज्यावर विश्वास ठेवला तर या बेटाकडे पाहण्याचीही हिंमत कधीच होणार नाही. बेटावर होतं मेंटल हॉस्पिटल मिररच्या रिपोर्टनुसार, 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल (Mental Hospital) होतं. 1930 च्या सुमारास या रुग्णालयाची स्थापना झाल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर हॉस्पिटलच्या संचालकाने उंच टॉवरवरून उडी मारून जीव दिल्याचं सांगण्यात येतं. यानंतर त्या आत्महत्येशी (Suicide) संबंधित किस्से बाहेर येऊ लागलं. या रुग्णालयातील रुग्णांवर विविध प्रकारचे प्रयोग करण्यात यायचे, अशीही अफवा आहे. आजही इथल्या खाली इमारतींमध्ये डॉक्टरांचे टूल्स (Doctor Tools) आणि तुटलेले बेड पडून आहेत. काही दिवस या ठिकाणी नर्सिंग होमही चालवलं जात होतं; पण 1968 पासून ते पूर्णपणे बंद करण्यात आलं. एकाचवेळी झाला होता 160,000 लोकांचा मृत्यू **(हे वाचा:** ऐकावं ते नवल! 23 वर्षीय तरुणीचा जडला खेळण्यावर जीव, आता म्हणते लग्न करणार तर त्याच्याशीच… ) वेनी आणि लिडो शहराच्या मध्यात पोवेग्लिया हे बेट आहे. 14 व्या शतकात येथे प्लेगचा (Plague) रोग पसरला आणि सुमारे 1 लाख 60 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला, असं म्हटलं जातं. या ठिकाणी ब्लॅक डेथचा (Black Death) संशय असलेल्या लोकांना वेगळं ठेवण्यात येत होतं. गेल्या 54 वर्षांपासून इथं कोणीही गेलेलं नाही आणि बेटावरील इमारतींचंही (Buildings) नुकसान झालं. या निर्जन बेटाला 2015 मध्ये पुन्हा विकसित करण्याचा प्रयत्न झाला; पण तो पूर्ण होऊ शकला नाही. तेव्हापासून इथे अधूनमधून फक्त YouTubers पोहोचतात आणि बेटाचे व्हिडिओ (Video) पोस्ट करत राहतात. पण हे युट्यूबर्स त्या रुग्णालयाच्या किंवा कोणत्याही इमारतीच्या आत कधीच पोहोचू शकले नाहीत.