JOIN US
मराठी बातम्या / Viral / Dog Suicide Bridge: या पुलावर पोहोचल्यावर कुत्रे आत्महत्या करतात? आजही उलगडलं नाही आहे हे गूढ

Dog Suicide Bridge: या पुलावर पोहोचल्यावर कुत्रे आत्महत्या करतात? आजही उलगडलं नाही आहे हे गूढ

तुम्हाला हे जाणून आश्चर्याचा धक्का बसेल, की प्राणीही आत्महत्या करतात. अगदी पाळीव प्राणीही आत्महत्या करतात. स्कॉटलंडमध्ये (Scotland) तर एक रहस्यमय पूल आहे, जिथून कुत्रे आत्महत्या (Dog’s Suicide) करतात. आजही यामागचं कोडं उलगडलेलं नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 18 जानेवारी: एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची (Suicide) घटना घडल्याचं अनेकदा समोर येतं. पण कधी प्राण्यांच्या आत्महत्येविषयी (Animal’s Suicide) ऐकलं आहे का? नाही ना, तुम्हाला हे जाणून आश्चर्याचा धक्का बसेल, की प्राणीही आत्महत्या करतात. अगदी पाळीव प्राणीही आत्महत्या करतात. स्कॉटलंडमध्ये (Scotland) तर एक रहस्यमय पूल आहे, जिथून कुत्रे आत्महत्या (Dog’s Suicide) करतात. आजही यामागचं कोडं उलगडलेलं नाही. जगभरात दर वर्षी लाखो व्यक्ती आत्महत्या करतात. मानसिक ताण,आर्थिक संकट, नैराश्य, राग, छळ अशी अनेक कारणं त्यामागे असतात. प्राण्यांच्या बाबतीत आत्महत्या करण्यामागे काय कारण असेल, याचा उलगडा झालेला नाही. त्यातूनही स्कॉटलंडमध्ये असलेल्या एका विशिष्ट पुलावरून कुत्रे आत्महत्या का करतात, हे तर अजब गूढ आहे. स्कॉटलंडमधला हा पूल सुसाइड ब्रिज (Suicide Bridge) म्हणूनच ओळखला जातो. दगडी मजबूत बांधकामाचा हा पुरातन शैलीतला पूल आजही त्याच्या मजबुतीची साक्ष देत उभा आहे. साधारण 50 फूट उंचीचा हा पूल हिरव्यागार दाट झाडीनं वेढलेल्या भागात आहे. अनेक जण इथं फिरण्यासाठी येतात; मात्र एखाद्या घरातला कुत्रा तिथे आला, तर तो चक्क या पुलावरून खाली उडी मारतो, जणू काही ते आत्महत्या करण्यासाठीच तिथे आले असावेत. हे वाचा- Shocking video! कुत्राही असं काही करू शकतो; त्याचं खतरनाक रूप CCTV मध्ये कैद आतापर्यंत शेकडो कुत्र्यांनी या पुलावरून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात 50 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. या पुलावर आल्यावरच कुत्र्यांना इथून खाली उडी मारण्याची इच्छा का होते, या रहस्यामागचं कारण अद्यापही उलगडलेलं नाही. आजही हा पूल एक कोडं बनून लोकांसमोर उभा आहे. अनेकांनी याचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न केला; मात्र अद्याप कोणालाही यश मिळालेलं नाही. हे वाचा- नुसता राडा! तरुणीने फोडल्या लाखो रुपयांच्या दारुच्या बाटल्या, पाहा VIDEO न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, या पुलावरून कुत्र्यांनी खाली उडी मारण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. या घटनांचं प्रमाण वाढल्यानंतर इथं तशी सूचनाही लावण्यात आली आहे. यामागे भुताटकी असल्याचाही काहींचा समज आहे. आजही या पुलावर व्हाइट लेडी नावाच्या महिलेचं भूत (White Lady’s Ghost) वावरत असल्याचं मानलं जातं. याबाबत प्रोफेसर पॉल ओवेन्स यांनी सखोल संशोधन केलं. त्यादरम्यान आपल्याला एक धक्कादायक अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलं. एकदा ते पुलावर उभे राहून खाली बघत असताना त्यांना कोणी तरी आपल्याला पाठीमागून स्पर्श केल्याचं जाणवलं. त्यामुळे या पुलावरून कुत्र्यांनी आत्महत्या करण्यामागे तिथे काही तरी भूत-प्रेतात्मा वास करत असल्याचं कारण असावं, असं मानलं जातं. याच पुलावरून कुत्र्यांना आत्महत्या करावीशी का वाटते, याचं नेमकं गूढ आजतागायत उकललेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या