बसचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल.
चेन्नई, 01 सप्टेंबर : खचाखच भरलेली बस, ट्रेन आणि त्याच्या दरवाजाला लटकून जीवघेणा प्रवास करणारे प्रवासी… असं दृश्य आपण बऱ्याचदा पाहतो. अशाच बसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल. कारण या बसच्या दरवाजाला नव्हे तर अख्ख्या बसलाच प्रवासी लटकले आहेत आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. सामान्यपणे बसमध्ये गर्दी असेल तर बसच्या दरवाजालाही काही प्रवासी लटकतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या बसच्या व्हिडीओत संपूर्ण बसला प्रवासी लटकले. व्हिडीओत पाहू शकता एक बस रस्त्यावरून वेगाने जात आहे. या संपूर्ण बसच्या एका बाजूला प्रवाशी लटकलेले दिसत आहे. प्रवाशांच्या भारामुळे बस एका बाजूने वाकडी झालेलीही दिसत आहे. हा बसचा नव्हे तर मृत्यूचाच प्रवास आहे, असंच हा व्हिडीओ पाहून वाटतं. हे वाचा - ते आले आणि जीव मुठीत धरून पळाले; 20 सेकंदात चोरांसोबत असं काही घडलं की… ; पाहा VIDEO हे दृश्य पाहूनच धक्का बसतो की अचानक या बसला लटकलेल्या एका शालेय मुलाचा हात सटकतो आणि तो या वेगवान बसवरून खाली कोसळतो. तो अगदी त्या बसच्या चाकाच्या जवळच असतो. जसा तो रस्त्यावर पडतो तसं बसचं चाक अगदी त्याच्या जवळून जातं. पण सुदैवाने ते त्याच्या अंगावरून जात नाही.
पण तरी भीती कायम आहे. कारण तो मोठ्या रस्त्यावर पडला आणि मागून येणारी एखादी गाडीही त्याला उडवू शकते. पण त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो इथंही वाचतो. कारण यावेळी तिथं मागून एकही गाडी आली नाही. त्यामुळे त्याच्यासोबत होणारी मोठी दुर्घटना घडली. जर बसच्या मागे एखादी गाडी असती तर हा मुलगा त्याखाली चिरडला गेला असता आणि त्याचा जीवही गेला असता. हे वाचा - रिक्षा चालकाकडून शाळेत जाणाऱ्या मुलांच्या जीवाशी खेळ, पाहा Viral Video @ravithinkz ट्विटर अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ पोस्टकरण्यात आला आहे. पोस्टवरील बऱ्याच कमेंटनुसार हा व्हिडीओ तामिळनाडूतील असल्याचं सांगितलं जातं आहे. तामिळनाडू राज्य परिवहन कार्पोरेशनला धारेवर धरलं आहे.