JOIN US
मराठी बातम्या / Viral / रातोरात झाला कोट्यधीश! खात्यात अचानक आले 25 कोटी रुपये, पण...

रातोरात झाला कोट्यधीश! खात्यात अचानक आले 25 कोटी रुपये, पण...

खात्यात एवढी मोठी रक्कम पाहून त्या व्यक्तीच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही आणि वास्तव समजल्यानंतर ते निराश झाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 मे : एका व्यक्तीच्या खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आल्याने ती व्यक्ती आश्चर्यचकित झाली. खात्यात एवढी मोठी रक्कम पाहून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी ते पैसे खर्च करण्याचं नियोजन सुरू केलं होतं. पण त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही आणि वास्तव समजल्यानंतर त्यांची निराशा झाली. ‘द सन’च्या वृत्तानुसार, ही व्यक्ती ब्रिटनची रहिवासी असून त्यांचं नाव मायकल कारपेंटर (Michael Carpenter) आहे. नुकताच मायकेल एका रात्रीत कोट्याधीश झाले. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. वास्तविक, यापूर्वी मायकलने हारग्रीव्स लॅन्सडाउन या स्टॉक फर्ममध्ये ((Stocks Firm) Hargreaves Lansdown) 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अलीकडेच, एके दिवशी सकाळी उठून त्यांनी पाहिलं की, त्यांच्याकडे एकमच अनेक कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यांच्या स्टॉकने त्यांना तब्बल 2,200 टक्के परतावा दिला होता आणि त्याची रक्कम एका रात्रीत 25 कोटींहून अधिक झाली, हे पाहून मायकेल यांना आश्चर्यचा धक्का बसला. मायकेल यांनी सांगितलं, सुरुवातीला त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मात्र, अनेकवेळा खातं पाहिल्यानंतर खात्यात खरोखरच 25 कोटी रुपये आल्याची त्यांची खात्री पटली. तशी त्यांनी आनंदाने उडी घेतली. मात्र, काही वेळातच त्यांनी विचार केला की कुठलाही स्टॉक एका रात्रीत इतका कसा वाढू शकतो? हे वाचा -  मंडपात नवरीनं विचारलं, तुला लग्न का करायचंय? वराचं उत्तर ऐकून केला असा चेहरा खात्यात एवढे पैसे कसे आले? अशा परिस्थितीत मायकल यांनी माहिती घेण्यासाठी Hargreaves Lansdown फर्मला फोन केला. फर्मनं तपासलं, तेव्हा त्यांना कळलं की, त्रुटीमुळे ती रक्कम मायकल यांच्या खात्यात दिसत होती. याबाबत कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, या स्टॉकशी संबंधित रक्कम ग्राहकाच्या खात्यात चुकीची दर्शवत होती, ती दुरुस्त करण्यात आली आहे. हे वाचा -  पोपट शोधून द्या आणि इतके हजार जिंका; मालकाने शहरभर लावले पोस्टर्स हे समजल्यानंतर मायकेल काहीसे निराश झाले. मात्र, सुरुवातीपासूनच त्यांना काहीतरी गडबड आहे, असं वाटत होतं, असं त्यांनी सांगितलं. यामुळेच त्यांनी फर्मला फोन करून खात्री केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या