प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल
मुंबई 6 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्या समोर असे काही व्हिडीओ येत असतात जे आपलं मनोरंजन करतात. तर काही असे व्हिडीओ देखील आपल्याला पाहायला मिळतात, जे धक्कादायक असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून त्यावर काय रिएक्शन द्यावी हेच तुम्हाला कळणार नाही. जर एकद्या व्यक्तीने आपल्या मनाशी एखादी गोष्ट करण्याची ठरवली, तर तो त्याला मिळवण्यासाठी काहीही करु शकतो. हे आपण ऐकलंच आहे. या गोष्टीला सामान्य लोक किती गांभिऱ्यानं घेतात हे माहित नाही, पण व्यसनी व्यक्ती मात्र काय करु शकतो? हे आज आम्ही तुम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. हा व्हिडीओ चोरीचा आहे आणि यामध्ये पोलिसांनी चोरांना ज्या ठिकाणाहून पकडलं, ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरंतर दोन दारुड्यांनी आपल्या व्यसनामुळे दारुच्या दुकानात दरोडा घालण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी बाजूच्या दुकानातून दारुच्या दुकानात जाण्यासाठी भिंतीमध्ये एक छोटी फट तयार केली. तसे पाहाता ही जागा फार छोटी होती. ज्यामधून एखादा व्यक्ती आत जाईल असं कोणी विचार देखील करणार नाही. परंतू दारूच्या ओढीने या दोन्ही दारुड्यांनी या छोट्या फटीमधूनच दारुच्या दुकानात प्रवेश केला. हे वाचा : सुंदर दिसण्यासाठी ती पार्लरमध्ये गेली, पण जेव्हा घरी परतली तेव्हा मात्र… नक्की काय घडलं? या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलीस एका भिंतीसमोर उभे आहेत. तेथे भिंतीच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी असल्याचे दिसते. त्यानंतर ही व्यक्ती त्या छोट्या जागेतून बाहेर येते. या भिंतीमागे एक नाही तर दोन चोर गेलेले असतात, ज्यांना नंतर पोलिसांकडून पकडण्यात आले आहे.
दारूच्या दुकानात चोरीची ही अजब घटना तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील आहे. जिथे दारूच्या दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने दोन चोरट्यांनी दुकानाच्या भिंतीला छोटे छिद्र पाडले. दुकानात चोरी करण्यासाठीच ते घुसले होते. ज्यानंतर रात्रीच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी या दारुड्या चोरांना पकडले आहे. हे वाचा :Video : सुंदर तरुणीला मदत केल्याची त्याला अशी किंमत मिळाली, पाहून तुम्ही म्हणाल, ‘आता तरी हुशार व्हा!’ व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून यूजर्स खूपच आश्चर्यचकित झाले आहेत आणि या चोरट्यांच्या कृतीवर हसत आहेत. या चोरट्यांना दुकानातून बाहेर काढण्यासाठी या चोरट्यांनी ज्या छिद्रातून आत प्रवेश केला त्याच छिद्राचा वापर पोलिसांनी केला. नोव्हिन्स्टन लोबो नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 48 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला असून यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.