नवी दिल्ली 02 जानेवारी : आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जो एकेकाळी कोट्याधीश होता. मात्र आज तो पूर्णपणे कंगाल झाला आहे. आता त्याच्या खात्यात केवळ 10 हजार रुपये उरले आहेत. हा व्यक्ती वेल्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये (Rich Person) गणला जात होता. या व्यक्तीचं नाव रॉब लॉयड असं आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एकेकाळी रॉब लॉयडची वर्षाची कमाई 3 कोटी 52 लाखाहून अधिक होती. ते 3 अरब 73 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक होते. त्यांच्याकडे ईटनफिल्ड ग्रुप नावाची एक कंपनी होती. मात्र त्यांना रेसिंग यार्ड बनवण्याची इच्छा निर्माण झाली. यानंतर रेसिंग यार्ड (Racing Yard) बनवण्यासाठी त्यांनी आपले 60 कोटी रुपये खर्च केले. यानंतर त्यांनी 20 कोटीहून अधिक रुपये खर्चून घोडे खरेदी केले. दरीच्या कडेला उभा राहून मित्राला देत होता झोका; पाय घसरला अन्…, Shocking Video 2009 साली रॉब लॉय़ चॅनल 4 च्या द सिक्रेट मिलियनेअर या हीट शोमध्येही आले होते. मात्र यानंतर दोनच वर्षात त्यांनी सर्वकाही गमावलं आणि 2011 साली ते 2 अरब 62 कोटी रुपयांच्या कर्जात बुडाले. इतकंच नाही तर एका भामट्याने डीलच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करत करोडो रुपये लंपास केले. 2017 साली एका रिअॅलिटी शोमध्ये रॉबच्या पत्नीने खुलासा केला होती की रॉबसोबत राहत असतानाच तिने एका करोडपती व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. रॉब आणि या महिलेची एक मुलगीही आहे. साल 2020 साली रॉबला कॅन्सर असल्याचं निदान झालं. काहीच काळात त्यांचा बँक बॅलन्सही संपला. शेवटी त्यांच्याकडे केवळ 10 हजार रुपये शिल्लक राहिले. इतकं सगळं झाल्यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले. रॉबची पहिली दोन लग्न अपयशी ठरली. रॉबच्या म्हणण्यानुसार अचानक सगळंच त्यांच्यापासून दूर गेलं. प्रॉपर्टी मार्केटमधील नुकसानानंतर कंपनी पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी त्यांनी आपलं रेसिंग यार्ड, फार्म आणि घोडे हे सर्व विकून टाकलं. नवरदेवाला मिळाली मित्रांच्या चुकीची शिक्षा; होणाऱ्या पत्नीने दिला लग्नास नकार आता रॉबने मारिया नावाच्या महिलेसोबत तिसरं लग्न केलं आहे. मारियासोबत लग्न केल्यानंतर ते अतिशय आनंदात राहू लागले आहेत. ते कॅन्सरवर उपचारही घेत आहेत. अचानकच त्यांचा संपूर्ण बिझनेस कोलमडला आहे. एकेकाळी अतिशय उत्तम आयुष्य जगणारे रॉब अचानक रस्त्यावर आले आहेत.