JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरे, हा तर Real life बाहुबली, एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे डोंगर; Video पाहून हैराण व्हाल!

अरे, हा तर Real life बाहुबली, एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे डोंगर; Video पाहून हैराण व्हाल!

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोशल मीडियावर तसे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र त्यातही काही व्हिडीओ असे असतात जे पाहून लोक हैराण होतात. इतकच नाही अशा व्हिडीओवर विश्वास ठेवताही येत नाही. एक असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video on Social media) व्हायरल होत आहे. जो पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण एकीकडे दरी तर दुसरीकडे डोंगर त्याशिवाय रस्त्यावर चिखल अशा ठिकाणी ही व्यक्ती खांद्यावर बाईक घेऊन जात आहे. त्याला पाहून लोक हैराण झाले आहेत. (Real life Bahubali a deep valley on one side a mountain on the other) सोशल मीडियावर तुम्ही कधी काय पाहायला मिळेल, काही सांगता येत नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांना तर यावर विश्वासच बसत नाही. सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळत नाही. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी तर पाणी जमा झालं आहे, यात अनेकांच्या दुचाकीचं काय तर चारचाकी गाड्याही वाहून गेल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ डोंगराळ भागातील असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा- मालकासाठी मांजरीने सापाला दिली टक्कर; 30 मिनिटापर्यंत त्याला रोखून धरलं ट्विटरवर हा व्हिडीओ @iamBawaal’नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 28 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या