ओटावा, 21 जानेवारी : इराण-अमेरिकेच्या संघर्षात युक्रेनच्या प्रवासी विमानावर क्षेपणास्त्र डागलं गेलं. यामध्ये 176 जणांना प्राण गमवावे लागले. विमान आपल्याकडून चुकून पाडलं गेल्याचं इराणने मान्यही केलं आहे. या विमान अपघातात वडिलांचे छत्र गमावलेल्या एका चिमुकल्याचे भाषण सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. सोशल मीडियावर हे भाषण व्हायरल होत आहे. कॅनडातील ओटावा इथं कार्टन युनिव्हर्सिटीमध्ये विमान दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या स्मरणार्थ प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रेयान नावाच्या मुलाने त्याच्या वडिलांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. रेयान म्हणाला की, माझ्या वडिलाच्या आवाजात किंवा त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नव्हती. मला असा एकही क्षण आठवत नाही आणि आठवणारही नाही. मी वाईट गोष्टींबद्दल बोलणार नाही. मला माहिती आहे जर माझे वडील जिवंत असते आणि इतर कोणाचा दुर्घटनेत मृत्यू झाला असता तर तेसुद्धा भाषणात वाईट बोलले नसते. म्हणून मीसुद्धा नकारात्मक बोलणार नाही.
वडिलांबद्दल एकाच शब्दात सांगायचं झालं तर मी ते खंबीर (स्ट्राँग)होते असं सांगेन. संकटामागून संकटे आली, अनेक वाईट वळणं आयुष्यात आली तरी खंबीरपणे लढले असं रेयान म्हणाला. एका लग्नाची गोष्ट! फोटोमागची कहाणी वाचून तुम्हालाही भारतीय असल्याचा वाटेल अभिमान आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर रेयानने सर्व लोकांचे आभार मानले. त्याच्या भाषणावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. ट्विटरवर मुलाचे कौतुक करायचं की त्याच्या वाट्याला आलेल्या दु:खाचं सांत्वन करायचं अशा संभ्रमात अनेकजण आहेत. ‘पप्पा तुम्ही परत या…’, चिमुरड्याचा निबंध वाचून पाणीच येईल डोळ्यात!