JOIN US
मराठी बातम्या / Viral / बाबो! एका नागिणीसाठी आपसात भिडले 2 विषारी साप; शेवट असा झाला की... Watch Video

बाबो! एका नागिणीसाठी आपसात भिडले 2 विषारी साप; शेवट असा झाला की... Watch Video

नागिणीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दोन सापांमध्ये जबरदस्त फायटिंग झाली.

जाहिरात

2 सापांच्या लढाईचा व्हिडीओ.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 01 सप्टेंबर : एका तरुणीवर अनेक तरुणांचा जीव जडला आणि मग तिला इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागली. तिच्यावर आपलं सर्वात जास्त प्रेम आहे हे सिद्ध करून तिला आपलं करण्यासाठी धडपड सुरू झाली. एका तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी किती पापड बेलावे लागतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रेमाची अशी परीक्षा फक्त माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही द्यावी लागते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका नागिणीसाठी दोन साप आपसात भिडले आहेत. निक अँगलर नावाच्या हाइकरने सापांच्या फायटिंगचा हा व्हिडीओ शूट केला आहे. यूएसच्या इंडियानातील ब्लूमिंग्टनच्या ग्रब रिज ट्रेलजवळ दोन रॅटल स्नेक्स तिला लढताना दिसले. त्यावेळी निकने हे दृष्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. निकने याचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निकने दिलेल्या माहितीनुसार, एका नागिणीला आपल्याकडे आकर्षित करण्याचा या सापांचा प्रयत्न होता. व्हिडीओत पाहू शकता दोन साप एकमेकांना लपेटून हवेत उडत आहेत. एकमेकांना ती जबरदस्त टक्कर देत आहेत. ज्या नागिणीसाठी ते लढत आहेत, ती नागीण या व्हिडीओत दिसत नाही आहे. पण ती तिथंच जवळपास असावी, असं सांगितलं जातं आहे. हे वाचा -  Shocking! भुकेल्या आईने आपल्या पिल्लालाच खाल्लं; काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक VIDEO डेली मेल च्या वृत्तानुसार निकने सांगितलं की तो हायकिंग करत होता, तेव्हा त्याच्या मार्गात हे दोन साप दिसले. एकमेकांना विळखा घातलेले आणि त्यांचं डोकं जमिनीपासून काही फूट उंचावर होतं. सापांची अशी लढाई आपण फिल्ममध्येच पाहिली होती, पण प्रत्यक्षात हे पाहणं अद्भुत होतं, असं तो म्हणाला.

सापांची ही लढाई जवळपास 20 मिनिटं झाली. यात कुणी हरलं नाही, कुणाचा जीव गेला नाही. पण दोघांपैकी एक थकला आणि तो तिथून दूर निघून गेला. हे वाचा -  ‘तो’ एकटा आणि चारही बाजूंनी विषारी सापांनी घेरलं; जगातील सर्वात खतरनाक Snake Rescue Video माहितीनुसार रॅटल स्नेक अशी लढाई करून मादीला प्रभावित करतात. मादी ज्याच्याकडे आकर्षित होते, त्याच्यासोबत संबंध ठेवते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या