JOIN US
मराठी बातम्या / Viral / दारु पिऊन तरुणाचा कोब्रासोबत नागीण डान्स, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

दारु पिऊन तरुणाचा कोब्रासोबत नागीण डान्स, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

सापाला पकडून त्याच्यासोबत मद्यधुंद तरुणाचा जीवघेणा खेळ, सोशल मीडियावर VIDEO चा धुमाकूळ

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दौसा, 05 जानेवारी: ज्याच्या एका फुत्कारानं अंग थरथर कापायला लागतं अशा कोब्रा सोबत चक्क तरुण नागीण डान्स करत असल्याचा VIDEO सोशल मीडियावर तुफान VIRAL झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ राजस्थानमधील दौसा इथला असल्याची माहिती मिळत आहे. मद्यधुंद नशेत असलेल्या तरुणानं कोब्र्याची (Alcohol)वाट अडवली आणि तिथेच गप्पा मारत बसला. कोब्र्याला त्याचा रस्ता अडवून खेळ करणाऱ्या तरुणाचा हा व्हि़डिओ अंगावर काटा आणणारा आहे. नशेत धुंद असलेल्या तरुणाचा सापासोबत खेळ सुरू झाला. अर्धा तास सापाला पकडून त्याच्यासोबत वेगवेगळ्या कसरतीही करून झाल्या. इतकच नाही तर तरुणानं सापासोबत नागीण डान्सही केला. सापानं मद्यधुंद तरुणाच्या तावडीतून सुटण्यासाठी हर तऱ्हेनं प्रयत्न केले. मात्र सगळे प्रयत्न अपयशी ठरले. शेवटी सापला घेऊन मद्यधुंद तरुणाचा नागीण डान्स सुरू झाला. अख्खा गाव हा सगळा गोंधळ पाहात होता. व्हिडिओ काढले जात होते. मात्र साप आणि तरुणातील हा जीवघेणा खेळ थांबवण्यासाठी पुढे सरसावण्याची हिंमत मात्र कोणात होत नव्हती. साप वारंवार नशेत धुंद असलेल्या तरुणाच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तरुण त्याला पुन्हा तितक्याच वेगानं पकडून पुन्हा खेळ करत होता. तरुणाने कोब्र्याला गळ्यात घातलं. उलटं-सुलटं फिरवलं, हातात पकडून नागीण डान्सही केला. जमीनीवर बसून त्याची वाट अडवून त्याला कविता ऐकवली. मात्र साप काही केल्या थांबण्यास तयार नाही हे पाहाता तरुणानं त्याला अंगावर घेऊन डान्स सुरू केला.

संबंधित बातम्या

हेही वाचा- सापाने कात टाकल्याचा लाईव्ह व्हिडिओ TikTok वर व्हायरल, तुम्हीही पाहून थक्क व्हाल हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोब्रा नुसता दिसला तरीही आपल्या अंगावर काटा येतो आणि मनात धडकी भरते. अशा कोब्रा जातीच्या सापला अंगावर घेऊन त्याच्यासोबत नागीण डान्स करण्याचं धाडस या मद्यधुंद तरुणानं केलं. अर्धा ते पाऊण तासाच्या या जीवघेण्या खेळानंतर दोन तरुणांनी मन घट्ट करून हिमत केली आणि मद्यधुंद तरुणाच्या तावडीतून सापाची सुटका केली. या संपूर्ण खेळात चिडलेल्या सापानं नशेत असलेल्या तरुणाला अनेक ठिकाणी दंश केला होता. तरुणाच्या शरीरात विश पसरल्यामुळे शरीर काळं निळ पडत होतं. तरीही सापाला सोडण्यास तरुण तयार नव्हता. अखेर दोन स्थानिक तरुणांनी मद्यधुंद तरुणासा सापापासून वेगळं केलं आणि रुग्णालयता उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याचा प्रकृतिबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र मद्यधुंद तरुणाचा कोब्रा सोबतचा जीवघेणा खेळ आणि नागीण डान्स मात्र अंगावर काटा आणणारा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हेही वाचा- चक्क सूर्य बोलल्याचा दावा, किरण बेदींनी शेअर केलेल्या VIDEO ची देशभर चर्चा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या