व्हायरल व्हिडीओ
मुंबई २५ नोव्हेंबर : साप किंवा अजगर म्हटलं की लोकांना भीतीच वाटते. फक्त सापाचं नाव जरी घेतलं तरी देखील लोक घाबरतात आणि लांब पळतात. कारण त्याच्या एका दंशाने तो कोणाचाही जीव घेऊ शकतो. एवढंच काय तर अजगर कोणालाही अख्खा गिळू शकतो. हेच कारण आहे की लोक त्याच्यापासून लांब पळतात. पण असं असलं तरी देखील लोकांना व्हिडीओमध्ये सापाला किंवा कोणत्याही हिंस्र प्राण्याला पाहायला आवडते. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे व्हायरल देखील होतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो खूपच धक्कादायक आहे. हे ही वाचा : नशेत मच्छिमाराने गळ्यात गुंडाळला अजगर, पुढे जे घडलं ते… पाहा Video एका अजगराने रस्त्याच्या मधोमध एका हरणाला असा काही विळखा घातला आहे की तो त्यामधून सुटूच शकत नाही. पण हरणाचं नशिब इतकं चांगलं होतं की तो या सगळ्यामधून जिवंत वाचला आहे. सहसा अजगराच्या तावडीत कोणी अडकलं तर निघणं तसं अशक्यच आहे. पण हरणाचं नशीब यावेळेला चांगलं होतं. निर्जन रस्त्यावर एक हरण फिरत असताना, या अजगराने त्याला टार्गेट केलं आणि आपलं भक्ष्य बनवण्याचा विचार केला आणि त्याला घेरलं देखील. हा अजगर रस्त्यावरच हरणाला गिळत होता. तेव्हा हे दृश्य काही लोकांनी पाहिलं आणि हरणाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यामध्ये यशस्वी देखील झाले.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती झाडाच्या फांदीचा आधार घेत अजगराला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. असं असलं तरी देखील सुरुवातीला अजगर काही हार मानत नाही आणि तो या व्यक्तीवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण अखेर तो हार मानून हरणाला सोडून निघून जातो.
हा व्हायरल व्हिडीओ Aditya Kumar Choudhary या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर असंख्य लाईक आणि शेअर आले आहेत. लोकांनी या व्हिडीओवर भरभरुन कमेंट केले आहेत.