JOIN US
मराठी बातम्या / Viral / उशिरा आलेल्या डिलीव्हरी बॉयला पाहताच ग्राहक स्तब्ध; हृदयस्पर्शी कारण वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

उशिरा आलेल्या डिलीव्हरी बॉयला पाहताच ग्राहक स्तब्ध; हृदयस्पर्शी कारण वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

रोहितकुमार यांनी लिहिलेली ही पोस्ट अर्थातच काळजाला हात घालणारी आहे. त्यामुळे ती खूप व्हायरल झाली. ज्यांना कृष्णप्पांना मदत करायची आहे, त्यांनी आपल्याशी संपर्क साधल्यास त्यांचा जी-पे नंबर देऊ, असंही रोहितकुमार यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11ऑगस्ट : ‘स्विगी’, ‘झोमॅटो’ हे गेल्या काही काळात (Swiggy) भारतीय शहरांमधल्या (Zomato) नागरिकांचं जीवन सुसह्य करणारे परवलीचे शब्द झाले आहेत. मौज म्हणून काही तरी वेगळं खावंसं वाटलं किंवा काही कारणाने घराबाहेर पडणं शक्य नसलं, तर फक्त मोबाइलवर जाऊन ऑर्डर दिली, की पुढच्या काही मिनिटांत मनपसंत डिश घरपोच, हे काही आता स्वप्न राहिलेलं नाही; मात्र ही बाब सत्यात उतरवण्यासाठी किती तरी डिलिव्हरी बॉइज त्रास झेलत असतात. रस्त्यावरचं ट्रॅफिक, ऊन-पाऊस-थंडी, गल्लीबोळातले पत्ते शोधणं अशा असंख्य अडचणींवर मात करत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत हे डिलिव्हरी बॉइज राबत असतात. अशाच एका डिलिव्हरी बॉयबद्दल एका ग्राहकाने लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती पोस्ट वाचून साऱ्यांच्याच डोळ्यांत पाणी येत आहे. तसंच, डिलिव्हरी बॉइज कोणत्या परिस्थितीत काम करत असतात, याचाही एक अंदाज येतो. ‘एनडीटीव्ही’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बेंगळुरूमधले रोहितकुमार सिंह यांनी लिंक्ड-इनवर ही पोस्ट लिहिली आहे. कृष्णप्पा राठोड नावाच्या स्विगी डिलिव्हरी बॉयबद्दलचा अनुभव त्यांनी या पोस्टद्वारे शेअर केला आहे.

LinkedIn form : 1985 मधला नोकरीचा अर्ज होतोय व्हायरल; मैत्रीची कहाणी सांगणारी पोस्ट चर्चेत

संबंधित बातम्या

त्यांनी असं लिहिलं आहे, की ‘मी सुंदर अशा पावसाळी रविवारी स्विगीवरून एक ऑर्डर केली. ती ऑर्डर अर्ध्या तासात पोहोचणं अपेक्षित असल्याची वेळ तिथे दाखवली जात होती. मी खूपच भुकेला होतो. त्यामुळे तो अर्धा तास कधीच संपला. तेवढ्यात पाऊसही पडायला लागला. माझा संयम सुटत चालला होता. मी डिलिव्हरी बॉयला कॉल केला. त्याने अत्यंत आश्वासक आणि नम्र स्वरात सांगितलं, की थोड्याच वेळात तो पोहोचेल. त्यानंतर थोडा वेळ गेला, तरीही तो न आल्याने मी त्याला परत कॉल केला आणि सांगितलं, ‘की भैया, थोडं लवकर या ना. भूक लागली आहे.’ त्याने परत एकदा त्याच स्वरांत सांगितलं, की आणखी 5 मिनिटं द्या. त्यानंतर पुढच्या 5-10 मिनिटांत घराची बेल वाजली. मी तातडीने दरवाजा उघडायला गेलो. डिलिव्हरीला उशीर झाल्याबद्दल जाब विचारण्यासाठी कदाचित माझी घाई असावी; पण मी दरवाजा उघडल्यावर मला समोर हसऱ्या चेहऱ्याची एक व्यक्ती माझी ऑर्डर हातात घेऊन उभी असलेली दिसली.’ रोहितकुमार (Rohitkumar Singh) यांनी लिहिलं आहे, की त्या व्यक्तीला पाहून त्यांना धक्काच बसला. कारण ती व्यक्ती अपंग होती. ‘गादीवर आरामात बसून संयम न राखता त्याला कॉल करणाऱ्या मला माझीच लाज वाटली. चाळिशीतली, करड्या रंगाचे केस असलेली ती व्यक्ती हातात Crutches (आधार) घेऊन, नम्रपणे माझी ऑर्डर घेऊन उभी होती. हे पाहिल्यावर मी त्यांची क्षमा मागितली आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचं नाव कृष्णप्पा राठोड असं होतं. कोरोना काळात त्यांची हॉटेलमधली नोकरी गेली. त्यामुळे तेव्हापासून ते डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी करत आहेत. त्यांना तीन मुलं आहेत; मात्र त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. म्हणून पहाटे लवकर उठल्यापासून रात्रीपर्यंत ते एखादी सुपरपॉवर असल्याप्रमाणे न थकता काम करत असतात, असं मला त्यांच्याशी दोन-तीन मिनिटं बोलल्यावर कळलं. मला आणखी संवाद साधायचा होता; पण पुढच्या ऑर्डरला उशीर होत असल्याचं सांगून ते लगेच निघूनही गेले,’ असंही रोहितकुमार यांनी लिहिलं आहे. VIDEO - लेकाच्या दिशेने आला मृत्यू; सुपरहिरोसारखा अवघ्या एका सेकंदात बाबाने वाचवला जीव रोहितकुमार यांनी लिहिलेली ही पोस्ट अर्थातच काळजाला हात घालणारी आहे. त्यामुळे ती खूप व्हायरल झाली. ज्यांना कृष्णप्पांना मदत करायची आहे, त्यांनी आपल्याशी संपर्क साधल्यास त्यांचा जी-पे नंबर देऊ, असंही रोहितकुमार यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टवर कमेंट करून अनेकांनी त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. उत्तम पोस्ट लिहिल्याबद्दल अनेकांनी रोहितकुमार यांचं कौतुक केलं आहे. एकाने तर आपल्या कॅफेमध्ये नोकरीही देऊ केली आहे. एकंदरीतच, रोहितकुमार यांच्या पोस्टमुळे कृष्णप्पांचे कष्ट तर सर्वांसमोर आलेच आहेत; पण डिलिव्हरी बॉइज कशा बिकट परिस्थितीतही काम करत असू शकतात, याची प्रचीतीही आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या