मुंबई, 11 ऑगस्ट : विमानाने प्रवास केलेला असो वा नसो आकाशातून उडणारं विमान आपल्या अगदी जवळून गेलं की त्याचा आनंद काही औरच असतो. एअरपोर्टच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी हे दृश्य नेहमीचं असतं. पण तसं विमान किती जवळून गेलं तरी त्याला आपण हात लावू शकतो, इतकंही ते जवळ नसतं. पण सध्या एक विमान थेट एका व्यक्तीच्या डोक्यावरच आलं आहे. विमानाच्या खतरनाक लँडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आकाशातून एक विमान थेट व्यक्तीच्या डोक्यावरच आलं. अगदी त्याच्या डोक्यावरील केसांना ते स्पर्श करून गेलं. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे. पाहताच हृदयाची धडधड वाढते. कदाचित तुम्ही तुमच्या आय़ुष्यात अशी लँडिंग कधीच पाहिली नसेल. WizzAir Airbus A321 विमान. तसं हवामान तर सामान्य दिसतं आहे. पण तरी या पायलटने खतरनाक लँडिंग केली आहे. व्यक्तीच्या अगदी डोक्यावरून हे विमान गेलं. त्याचवेळी ही व्यक्ती खाली वाकली तरी विमानाने त्या व्यक्तीच्या केसांना स्पर्श केला. थोडं जरी हे विमान खाली असतं तर या व्यक्तीचं डोकंच उडालं असतं.
जिथं हे विमान लँड करत असताना समुद्रकिनाऱ्याजवळ येताच इतकं खाली आलं. तिथे असलेले लोकही हैराण झाले. GreatFlyer युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल आहे. हे वाचा - अद्भुत! धरतीवरून अवकाशात कोसळली वीज, कधीच पाहिला नसेल असा निसर्गातील चमत्कार; Watch Video ग्रीसच्या Skiathos Airport वरील हे दृश्य आहे. हे एअरपोर्ट समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. या एअरपोर्टचा रनवे खूप लहान आहे. फक्त 1628 मीटर लांबीचा आहे. इथं फक्त बोईंग 767-200 विमानांचीच लँडिग होऊ शकते.