पुलाखाली विमान
हैदराबाद, 14 नोव्हेंबर : ब्रीजखाली एखादा मोठा ट्रक किंवा भलीमोठी गाडी अडकणं ठिक आहे. पण एखादं विमान ब्रीजखाली अडकलं असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्यच वाटेल ना. कारण सामान्यपणे विमान म्हटलं तर एक म्हणजे एअरपोर्ट आणि दुसरं म्हणजे आकाश इतकंच आपल्यासमोर येतं. हायवेवर गाड्यांप्रमाणे चालणारं विमान आपण कधीच पाहिलं नाही. पण असंच एका हायवेवर विमान पाहायला मिळालं. हे विमान उड्डाणपुलाखाली अडकलं. आंध्र प्रदेशच्या बापटला जिल्ह्यातील ही घटना आहे. कोरिसापाडू अंडरपासवर हे विमान अडकलं. हे विमान अशा पद्धतीने अडकलं की त्यामुळे हायवेवर ट्रॅफिक जाम झालं. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शनिवारी घडलेली ही घटना आहे. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. विमान पाहून इतर लोकही हैराण झाले आहेत. हे वाचा - खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीनं केलं असं काम, अखेर अधिकाऱ्यांना रातोरात बांधावा लागला रस्ता आता विमान कधी हायवे-वर चालत नाही. म्हणजे त्यासाठी खास एअरपोर्ट असतात. असं असताना रस्त्यावर हे विमान हायवे-वर आलं तरी कसं, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हे विमान हैदराबादचं प्रसिद्ध रेस्टॉरंट पिस्ता हाऊसच्या मालकाचं आहे. प्लेनमध्ये रेस्टॉरंट खोलण्याची त्यांची योजना आहे. त्यासाठी हे जुनं विमान त्यांनी खरेदी केलं. हायवे मार्गाने हे विमान आणलं जात होतं.
ट्रेलरवर ठेवून हे विमान कोच्चीहून हैदराबादला आणलं जात होतं त्यावेळी ते बापटलाच्या अंडरपासमध्ये अडकलं. बऱ्याच प्रयत्नानंतर हे विमान बाहेर काढण्यात आलं. विमानाचं काही नुकसान झालं नाही. हे वाचा - VIDEO - बापरे! हा असा कसला परिणाम; प्लेन उडताच काही क्षणात अचानक म्हातारी झाली महिला याआधी डिसेंबर 2019 सालीसुद्धा अशीच घटना घडली होती. पश्चिम बंगालच्या दुर्गापूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली एक विमान अडकून पडलं होतं. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. ट्रेलरवर भारतीय पोस्टल खात्याचे जुने विमान एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना चालकाला धुक्यामुळे ओव्हर ब्रिज दिसला नाही. ओव्हर ब्रिजखाली विमान येताच विमान तिथेच अडकले. हे रखडलेले विमान पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली होती.