JOIN US
मराठी बातम्या / Viral / रोमँटिक प्रपोजचा अनपेक्षित शेवट; कॅमेऱ्यात कैद झाला तो विचित्र क्षण, पाहा VIDEO

रोमँटिक प्रपोजचा अनपेक्षित शेवट; कॅमेऱ्यात कैद झाला तो विचित्र क्षण, पाहा VIDEO

एका प्रपोजचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Funny Propose Video) होत आहे. हे प्रकरण प्रियकर किंवा प्रेयसीमुळे नाही तर फोटोग्राफरमुळे चर्चेचा विषय ठरलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 जून : अनेकदा जेव्हा कोणी एखाद्याला प्रपोज करतं तेव्हा ती वेळ या दोन्ही व्यक्तींसाठी सर्वात मौल्यवान आणि खास असते. यामुळे अनेक जोडपी हा क्षण कॅप्चर करण्यासाठी भरपूर तयारी करतात. कारण हे क्षण कॅमेऱ्यात कैद करून आयुष्यभर आपल्यासोबत ठेवण्याची जोडप्याची इच्छा असते. यासाठी काही लोक आपल्या मित्र-मैत्रिणींची मदत घेतात तर काही लोक यासाठी प्रोफेशनल फोटोग्राफर बोलवतात. सध्या अशाच एका प्रपोजचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Funny Propose Video) होत आहे. हे प्रकरण प्रियकर किंवा प्रेयसीमुळे नाही तर फोटोग्राफरमुळे चर्चेचा विषय ठरलं आहे. VIDEO: लग्नाच्या दिवशीही नवरदेव स्वतःच्याच नादात मग्न; मंडपात जे केलं ते पाहून खळखळून हसाल व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक प्रियकर आपल्या प्रेयसीला प्रपोज करत आहे. यासाठी तो सगळ्यात आधी आपल्या खिशातून रिंग काढतो आणि आपल्या प्रेयसीच्या बोटात घालू लागतो. यादरम्यान महिला फोटोग्राफर हा क्षण कॅप्चर करण्यासाठी त्यांच्याजवळ जाण्याच्या प्रयत्नात असते. मात्र यादरम्यान ती एका दगडाला धडकून धाडकन जमिनीवर कोसळते.

संबंधित बातम्या

30 सेकंदांचा हा मजेदार व्हिडिओ @TheFigen नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत मजेशीर कॅप्शनही देण्यात आलेलं आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओला 6.5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोक या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. शिकारीच्या शोधात पर्यटकांच्या कॅम्पमध्ये शिरला सिंह; शेवटी काय घडलं पाहा, Shocking Video एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं की व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, ही कॅमेरामॅन खरंच खूप डेडिकेटेड आहे. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या