JOIN US
मराठी बातम्या / Viral / धक्कादायक! आधी पेट्रोल भरलं, नंतर कर्मचाऱ्यालाही गाडीत कोंबलं; अपहरणाचा LIVE VIDEO

धक्कादायक! आधी पेट्रोल भरलं, नंतर कर्मचाऱ्यालाही गाडीत कोंबलं; अपहरणाचा LIVE VIDEO

पेट्रोल पंपावरील अपहणरणाची ही घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑक्टोबर :  सध्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) किमती वाढत आहेत (Petrol-diesel price). अशातच आता पेट्रोल पंपावरील (Petrol pump) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात चक्क पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचंच (Petrol pump emloyee kidnapping video) अपहरण करण्यात आलं आहे. गाडीत पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने अपहरणकर्ते आले आणि कर्मचाऱ्याचं अपहरण करून पसार झाले (Kidnapping video). अपहरणाच्या बऱ्याच बातम्या तुम्ही पाहिल्या असतील, वाचल्या असतील. काही व्हिडीओसुद्धा तुम्ही पाहिले असतील. पण असं अपहरण कदाचित पाहिलं नसेल. चक्क एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्यालाच घेऊन अपहरणकर्ते पळाले आहेत. पेट्रोल पंपावरील अपहणरणाची ही घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता पेट्रोल पंपावर एक गाडी उभी आहे. तिथला कर्मचारी गाडीत पेट्रोल भरतो आहे. त्याचवेळी गाडीतील एक व्यक्ती बाहेर येते आणि या कर्मचाऱ्याच्या बाजूला उभी राहते. एक व्यक्ती गाडीत आहे, जी या कर्मचाऱ्याचं पेट्रोल भरून झाल्यानंतर तिला पैसे देते. त्यानंतर त्या व्यक्तीला सुट्टे पैसे देण्यासाठी म्हणून कर्मचारी पुन्हा गाडीजवळ जातो आणि तेव्हा त्याच्याजवळ उभी असलेली व्यक्ती त्याला धरते आणि गाडीतच कोंबते आणि मग गाडी घेऊन ते फरार होतात. हे वाचा -  चमत्कार की नशीब? चिमुकल्याच्या अंगावरून गेली गाडी, पण खरचटलंही नाही; पाहा VIDEO giedde इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टनुसार हे अपहरणकर्ते पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यालाच घेऊन गेले कारण त्याच्या खिशात दिवसभरात भरलेल्या पेट्रोलचे पैसे होते. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, कधीचा आहे माहिती नाही. पण आपण कुठेही असलो तरी सावध राहायला हवं हे मात्र यातून स्पष्ट होतं. चोर असो, दरोडेखोर असो किंवा अपहरणकर्ते कधी, कुठे, काय आणि कसं करतील सांगू शकत नाही. त्यामुळे नेहमी सावध राहावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या