JOIN US
मराठी बातम्या / Viral / Yuck! उंटाजवळ जात व्यक्तीचं किळसवाणं कृत्य; VIDEO पाहूनच उलटी येईल

Yuck! उंटाजवळ जात व्यक्तीचं किळसवाणं कृत्य; VIDEO पाहूनच उलटी येईल

उंटाजवळ जात व्यक्तीने जे केलं ते पाहूनच धक्का बसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 मार्च : उंटाची सवारी करायला कुणाला आवडणार नाही. त्यामुळे वाळवंटी प्रदेशात गेल्यावर लोक हमखास उंटासोबत, उंटावर बसून आपले फोटो काढतात. सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करतात. पण सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा उंटासोबतचा असा व्हिडीओ व्हायरल (Camel Viral Video) होतो आहे, जो पाहूनच किळस येईल. या व्यक्तीने उंटासोबत असं काही केलं आहे, जे पाहूनच तुम्ही शॉक व्हाल. उंटांच्या तांड्यात ही व्यक्ती घुसते. तिथे सुरुवातीला एका उंटाजवळ ही व्यक्ती जाते. या व्यक्तीने उंटाच्या मागच्या बाजूला खालील दिशेने हात ठेवल्याचं दिसून येईल. त्यानंतर ही व्यक्ती आपल्या हातात काहीतरी घेते आणि ते तोंडावरून फिरवते. त्याच्या हातात दुसरं तिसरं काही नाही तर चक्क उंटाची लघवी आहे. व्हिडीओत पाहू शकता उंट लघवी करते तेव्हा ती लघवी ही व्यक्ती हातात घेते आणि त्यानेच आपलं तोंड धुते. एका उंटाची लघवी संपल्यानंतर ती दुसऱ्या उंटाकडे जाते. तिथेसुद्धा असंच करताना दिसते. इतकंच नव्हे तर ही व्यक्ती उंटाची लघवी पितेसुद्धा. हे वाचा -  2 वाघिणींच्या लढाईत बिबट्या लटकला; मध्यस्थी करायला जाताच…; पुढे काय घडलं पाहा @AnamikaamberA ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “पाहिल्यानंतर हा व्हिडीओ एखाद्या अरब देशातील वाटतो. लोक उंटाच्या लघवीने तोंड धुतात आणि तहानही भागवतात. कारण काहीही असो हे सर्वकाही विश्वासाचं प्रकरण आहे”

संबंधित बातम्या

सौदी अरबमध्ये उंटाची लघवी प्यायल्याने अनेक आजार दूर राहतात असं मानलं जातं. काही लोकांच्या मते, काही आखाती देशात दुधात उंटाची लघवी मिसळून पितात. हे वाचा -  ओ तेरी! चक्क मोर - शेळी आपसात भिडले; कधीच पाहिला नसेल असा जबरदस्त FIGHTING VIDEO हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे. ही व्यक्ती असं का करते, याबाबत माहिती नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या