JOIN US
मराठी बातम्या / Viral / 30 वर्षीय मुलीने चक्क देवासोबत बांधली लग्नगाठ! निर्णयाने वडील नाराज आईने दिली साथ

30 वर्षीय मुलीने चक्क देवासोबत बांधली लग्नगाठ! निर्णयाने वडील नाराज आईने दिली साथ

एका तरुणीने चक्क देवाशीच लग्नगाठ बांधली आहे. 300 लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.

जाहिरात

30 वर्षीय मुलीने चक्क देवासोबत बांधली लग्नगाठ!

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 14 डिसेंबर : भारतीय समाजात नवऱ्याला देव मानणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत; पण देवालाच नवरा मानून त्याच्याशी संसार थाटण्याची स्वप्न पाहणं हा सध्याच्या काळात वेडेपणाच समजला जाईल. जयपूरमधल्या 30 वर्षांच्या तरुणीने चक्क श्रीकृष्णासोबत लग्नगाठ बांधून संसार सुरू केलाय. तिचं हे पाऊल अनेकांना विचित्र वाटत असलं, तरी पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादविवादांमुळे तसं केल्याचं तिने सांगितलं. राजस्थानातल्या जयपूरमधल्या पूजा सिंहचं लग्न 8 डिसेंबरला झालं. 300 जणांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला; मात्र नवरदेव म्हणून ठाकूरजी अर्थात साक्षात श्रीकृष्ण होते. एखाद्या सर्वसामान्य मुलीप्रमाणे लग्न करून संसार थाटण्याचं वय असताना श्रीकृष्णासोबत लग्न करणं ही गोष्ट सध्याच्या काळात विचित्र वाटते; मात्र तसं करण्यासाठी काही कारणं असल्याचं पूजा सांगते. “लग्नाचं वय झाल्यावर आमच्याही घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. काही स्थळंही येत होती; मात्र मी आजवर अनेक दाम्पत्यांमधली भांडणं पाहिली आहेत. अशा घटनांमध्ये बायकोला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. त्यामुळे मी मोठं झाल्यावर लग्न न करण्याचा निर्णय घेतला,” असं पूजा म्हणते. आई-वडिलांना निर्णय सांगितला होता; मात्र लग्नाचं वय झाल्यावर लग्न करायला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. एक-दोनदा मुलगा पाहण्याचा कार्यक्रमही झाला. मग आलेल्या स्थळांना नकार देऊन लग्न न करण्याची इच्छा व्यक्त केली, असं ती म्हणाली. तुळशीच्या लग्नाबाबत पूजानं ऐकलं होतं. आजोळी एकदा पाहिलंही होतं. त्यावरूनच तिने श्रीकृष्णांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गुरुजींना त्याबाबत विचारलं असता, त्यांनीही ते शक्य असल्याचं सांगितलं. ‘भगवान विष्णूंशी होणारा लग्नसंस्कार शास्त्रोक्त आहे. तुळशी विवाहाप्रमाणेच हे लग्न असतं. पूर्वीच्या काळी अशी लग्नं होत होती. कर्मठगुरू पुस्तकात पान क्रमांक 75 वर त्याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे,” असं गुरुजी राकेशकुमार शास्त्री यांनी सांगितलं. वाचा - भरमंडपात दे दणादण! नवरा-नवरीनेच एकमेकांना धू-धू धुतलं; काय झालं असं Watch Video पूजाने हे आई-वडिलांना सांगितल्यावर सुरुवातीला त्यांचा नकार होता; मात्र नंतर आईने परवानगी दिली. पूजाच्या वडिलांनी मात्र अशा लग्नाला पहिल्यापासूनच विरोध केला. ते लग्नालाही आले नाहीत. तिच्या आईनेच सगळे विधी केले. पूजाने पॉलिटिकल सायन्समध्ये एमए केलं आहे. तिचे वडील प्रेमसिंह बीएसएफमधून निवृत्त झाले असून, आई रतन कंवर गृहिणी आहे. वडील मध्य प्रदेशात एक सुरक्षाविषयक कंपनी चालवतात. अंशुमान सिंह, युवराज आणि शिवराज हे तिचे भाऊ शिक्षण घेत आहेत. तिने ठाकूरजींशी लग्नाचा निर्णय घेतल्याने नातेवाईक व इतर मंडळीही नाराज झाली; मात्र हे लग्न धूमधडाक्यात झालं. जवळपास 300 जण लग्नाला आले. त्याकरिता 3 लाख रुपये खर्च आला. हळद, मेंदी अशा सर्व प्रथा-परंपरांनुसार लग्न झालं. पूजाच्या मैत्रिणीही लग्नात सहभागी झाल्या होत्या. लग्नात नवऱ्याकडून सिंदूर लावण्याच्या प्रथेमध्ये बदल करून पूजानेच स्वतःला सिंदूर लावून घेतला. भगवान श्रीकृष्णांना चंदन आवडत असल्याने तिने सिंदूर म्हणून चंदन लावलं. वाचा - लग्नामध्ये लाथा बुक्क्यांची बरसात, यजमान वऱ्हाड्यांच्या हाणामारीचा Video Viral पूजाचं हे लग्न विधिवत झालं. गणेश पूजनापासून कन्यादानापर्यंत सर्व विधी झाले. कन्यादानापोटी 11 हजार रुपयेही देण्यात आले. श्रीकृष्णांना एक सिंहासन आणि वस्त्रं देण्यात आली. पूजाच्या पाठवणीचा सोहळाही या लग्नात झाला. घराच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन पूजाची पाठवणी करण्यात आली, भगवान श्रीकृष्णांना नंतर मंदिरात विराजमान करण्यात आलं.

या आगळ्यावेगळ्या लग्नानंतर पूजा तिच्या घरीच, तर भगवान श्रीकृष्ण मंदिरात राहतात. पूजानं तिच्या खोलीतच एक देवघर तयार केलं आहे. तिथे ती श्रीकृष्णांची पूजा करते. तिच्या खोलीत ती जमिनीवर झोपते. रोज सकाळी भगवान श्रीकृष्णांसाठी नैवेद्य करते. मंदिरातले पुजारी तो नैवेद्या दाखवतात. संध्याकाळीही ती दर्शनाला जाते. पूजाच्या या वेगळ्या लग्नामुळे अनेक जण तिच्यावर नाराज झालेत. काहींनी तिची चेष्टाही केली; मात्र पूजाने त्याकडे दुर्लक्ष केलं. आता वडिलांचीही नाराजी दूर करू असा विश्वास तिला वाटतोय. तिला संगीत क्षेत्र आवडतं. त्यातच पुढे काही तरी करण्याचा विचार असल्याचं तिचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या