JOIN US
मराठी बातम्या / Viral / कायच्या काय! इथे लग्नात पैसे देऊन बोलावले जातात पाहुणे; रंजक कारण जाणून व्हाल अवाक

कायच्या काय! इथे लग्नात पैसे देऊन बोलावले जातात पाहुणे; रंजक कारण जाणून व्हाल अवाक

इथे मोठं कुटुंब आणि मित्र परिवार दाखवण्यासाठी लोक पैसे गेस्ट बोलवतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य़ वाटेल की यासाठी एजन्सीही चालवल्या जातात (Wedding Guest Hiring Agency).

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 24 ऑक्टोबर : आपल्या देशात लग्न (Wedding in India) हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. लग्नात भरपूर पाहुणेही बोलवले जातात. अशात पाहुण्यांच्या यादीत कोणाला सामील करावं आणि कोणाला नाही, असा प्रश्न अनेकदा पडतो. मात्र, एक देश असाही आहे, जिथे पैसे देऊन पाहुणे बोलावले जातात (Paid Guests in Wedding). कारण लग्नात जितके पाहुणे दिसतील, तितकं त्यांचं सोशल सर्कल मोठं दिसेल (Social Circle). वाह रे पठ्ठ्यांनो..! रस्त्यावरच रंगली चिमुकल्यांची कुस्ती; हा VIDEO एकदा बघाच लग्न हा दोन मुलांचं नातं जुळवणारा उत्सव असतो. त्यामुळे यात त्यांचं सोशल स्टेटसही (Social Status) दिसतं. दक्षिण कोरियातील लोकांसाठी लग्नात अधिकाधिक लोक सहभागी होणं म्हणजे समाजातील त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावा असतो. इथे मोठं कुटुंब आणि मित्र परिवार दाखवण्यासाठी लोक पैसे गेस्ट बोलवतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य़ वाटेल की यासाठी एजन्सीही चालवल्या जातात (Wedding Guest Hiring Agency). दक्षिण कोरियामध्ये अनेक एजन्सीज वेडिंग गेस्ट्सचा बिजनेस करत आहेत. या एजन्सी लग्नासाठी भाड्यानं पाहुणे उपलब्ध करून देतात. हे पाहुणे अगदी ट्रेंड असतात आणि लग्नात अशी अॅक्टिंग करतात जणू काही ते या कुटुंबाचे जवळचे नातेवाईक आहेत. Hagaek Friends सारख्या अनेक एजन्सी फेक गेस्ट उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे लग्नातील रिकाम्या सीट भरून देतात. कोरोना काळात मात्र या एजन्सीज संकटात आल्या. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांचा बिजनेस सुरळित सुरू झाला आहे, कारण लग्नाचा सीझन पुन्हा सुरू झाला आहे. डेटिंगसाठी वृद्ध श्रीमंत माणसाला शोधत होती, वेबसाइटवर स्वतःचे वडील सापडले आणि… आधी दक्षिण कोरियात ९९ हून अधिक लोक लग्नात सहभागी होऊ शकत नव्हते. मात्र, आता ही संख्या २५० करण्यात आली आहे. एजन्सीजनं सांगितलं, की निर्बंध शिथील झाल्यापासून त्यांना भरपूर कॉल येत आहेत. आधी लोकांनी भाड्यानं केवळ ५-१० च पाहुणे हवे असत. मात्र, आता २० ते २५ पाहुणे पाहिजे असतात. एक पाहुणा भाड्याने या लग्नात जाण्यासाठी १५०० रुपये घेतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या