बिहार, 29 फेब्रुवारी : बिहारमध्ये काही वर्षांपूर्वी दारू बंदी लागू करण्यात आली. मात्र त्यानंतरही दारू माफियांना दारू विकण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढले आहेत. अलीकडेच बिहारमध्ये रेल्वेच्या पँट्री कारमधून दारू विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता तर चक्क पाण्याच्या टॅंकरमधून दारू विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी बिहारच्या सारण शहरात दारू असलेले पाण्याचे टँकर जप्त केले आहेत. या टँकरमधून पोलिसांनी अवैध असे दारूचे 330 बॉक्स जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेटी बचाओ-बेटी पढाओ आणि स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा टॅंकरवर लिहित पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात होता. यातूनच टॅंकरमध्ये भरून दारू आणण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, टँकरमध्ये दारूच्या बाटल्या ठेवण्यासाठी डिझाइन केले होते. या टँकरच्या माध्यमातून बिहारच्या विविध भागात दारूच्या बाटल्या पुरविण्यात आल्या होत्या. वाचा- महिलांनो, Breast ला येणाऱ्या खाजेकडे दुर्लक्ष नको; असू शकतं गंभीर आजारांचं लक्षण वाचा- VIRAL VIDEO : 3 वर्षाच्या चिमुरडीने Cute आवाजात गायलं ‘दिल है छोटा सा’
वाचा- सरकारला अंधारात ठेऊन पाकमध्ये पोहचला भारतीय संघ, VIRAL फोटोनं उडवली झोप वाचा- Kiss नव्हे हा तर ‘कोरोना’चा डंक, Kiss Day ला राहा सावध ! कार, टॅंकर पोलिसांनी केली जप्त पटना येथील पोलिसांनी हे टॅंकर जप्त केले असून, यासोबत दोन वाहनेही जप्त केली आहेत. पोलिसांच्या चौकशीत होळीसाठी दारूची तस्करी केली जात असल्याचे सांगितले. या टँकरसह पोलिसांनी कारचालक सोनूलाही अटक करण्यात आली आहे. सोनू अलीगडचा रहिवासी असून बिहारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात दारूचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले. एसपी हरकिशोर राय म्हणाले की, होळीमुळे अनेक जिल्ह्यात दारूची मागणी वाढली आहे आणि यामुळे पोलिस पथक उत्तर प्रदेशातून बिहारकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.