JOIN US
मराठी बातम्या / Viral / SO SWEET! या पोपटाचं टॅलेंट पाहून सर्वजण झाले थक्क; एकदा पाहाच हा VIDEO

SO SWEET! या पोपटाचं टॅलेंट पाहून सर्वजण झाले थक्क; एकदा पाहाच हा VIDEO

बोलणाऱ्या आणि गाणाऱ्या इतर पोपटांपेक्षा या पोपटाने काहीतरी वेगळं करून दाखवलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 मे : बोलणारा पोपट तुम्ही पाहिला असेल. सोशल मीडियावरही अशा पोपटाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात (Parrot video). पण सध्या अशा एका पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याचं टॅलेंट पाहून सर्वजण थक्क झाले आहेत (Parrot Dancing On Mobile Ringtone). या पोपटाने अॅक्टर, डान्सर्सनाही मागे टाकलं आहे. त्याने असं काही करून दाखवलं की तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल (Bird Dancing On Ringtone). पांढऱ्या रंगाच्या या पोपटाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुरुवातीला हा पोपट बोलेल, काहीतरी गाणं गायेल असं वाटतं. पण हा पोपट बोलत नाही किंवा गातही नाही. त्याने इतर पोपटांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याचा आपण विचारही केला नसेल. इतर पोपटांपेक्षा वेगळं असं आपल्यात दडलेलं टॅलेंट त्याने दाखवलं आहे. आता हे टॅलेंट काय ते पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल. हा पोपट मोबाईल फोनच्या रिंगटोनवर भन्नाट डान्स करतो. वेगवेगळ्या रिंगटोनवर तो वेगवेगळ्या स्टेप्स करतो. जसजशी मोबाईलची रिंगटोन बदलते तसतसं तो आपल्या डान्स स्टेप्सही बदलतो. हे वाचा -  बापरे! चक्क चित्त्यालाच किस करायला गेली तरुणी आणि…; Shocking आहे Video चा शेवट व्हिडीओत पाहू शकता एका व्यक्तीने हातात मोबाईल धरला आहे. समोर हा पोपट उभा आहे. मोबाईलमध्ये जशी रिंगटोन वाजते तसं पोपट नाचू लागतो. व्यक्ती हळूहळू रिंगटोन बदलते. तसं पोपटही आपल्या डान्स स्टेप्स बदलताना दिसतो. रिंगटोननुसार तो डान्स करतो.

fgnszgn नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सना हसू आलं आहे. हा व्हिडीओ पाहून मन प्रफुल्लित झाल्याची प्रतिक्रियाही एका युझरने दिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा. आयफोन रिंगटोनचा आवाज काढणारा पोपट आता पोपटही टेक्नो फ्रेंडली झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण याआधीही हुबेहूब आयफोनच्या  iPhone रिंगटोनसारखा आवाज काढणाऱ्या पोपटाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

या पोपटाने आयफोनची रिंगटोन इतक्या वेळा ऐकली की तो त्याची नक्कल करण्यात पटाईत झाला. पोपट रिंगटोनचा आवाज काढतो आणि त्याला आपला फोन वाजल्यासारखा वाटतो. हे वाचा -  बाईकला धडक देणाऱ्या महिला कार चालकासोबत तरुणाचं शॉकिंग कृत्य; हैराण करणारा VIDEO @unilad इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. खरंतर हा व्हिडीओ पाहण्याआधी तुम्ही डोळे बंद करून फक्त ऐका आणि त्यानंतर डोळे उघडून पाहा. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुमचा स्वतःचे कान आणि डोळे यावरही विश्वास बसणार नाही. आपण जे पाहतो आहे ऐकतो आहे ते खरं आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या