व्हायरल व्हिडीओ
मुंबई 27 डिसेंबर : अनेकदा सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, जे आपल्याला पोट धरुन हसायला भाग पाडतात. हे व्हिडीओ कधी मुद्दाम तयार केले गेले असतात. तर काही व्हिडीओ हे खऱ्या घडनेचे असतात. सोशल मीडियावर ‘पापा की परी’ संबंधी देखील अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. ज्यामध्ये काही मुली गाडी चालवताना अशा काही चुक करतात, ज्यामुळे त्या स्वत:चं तर नुकसान करुन घेतात, शिवाय दुसऱ्याचं देखील नुकसान होतं. हे ही पाहा : तरुणीने अशी काही स्कूटी चालवली की थेट हवेतच उडाली… Video पाहून थांबणार नाही हसू आता देखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल, कारण या व्हिडीओमध्ये पापा की परीने आपलं तोंड स्वत:चं काळं करुन घेतलं. हे तोंड फक्त बोलण्यापूर्त नाही बरं का… त्यांनी त्यांच्या कृत्याने खरंखुरं तोंड काळं करुन घेतलं आहे. नक्की काय घडलं? स्कूटीवरुन तीन मुली जात होत्या, तेव्हा रस्त्यात असं काही घडलं की त्यांची स्कूटी थेट नाल्याच जाऊन पडली. शिवाय त्या तिघी देखील नाल्यात पडल्या, ज्यामुळे त्यांच तोंडच काय तर संपूर्ण शरिर काळ झालं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात अपलोड केला.
हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूप वेळा पाहिला जात आहे. ज्यावर लोक जोरदार लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर funtaap नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे दीदी.’ या व्हिडीओवर इतर अनेकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘पप्पाच्या परी उडू शकल्या नाहीत.’
आणखी एका युजरने लिहिले की, ‘मुलींना ड्रायव्हिंग लायसन्स कोण देते हे मला समजत नाही.’ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर आणखीही अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत.