लाहोर, 5 सप्टेंबर : पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील (Pakistan news channel) न्यूज अँकर (News Anchor) निदा यासीर (Nida Yasir) तिने विचारलेल्या प्रश्नांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. फॉर्म्युला वन रेसिंग कारबाबत (Formula One racing car) स्टुडिओतील पाहुण्यांना प्रश्न विचारताना तिला या खेळाबाबत काहीच माहिती नसल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. त्यामुळे तिने विचारलेले प्रश्न हे अत्यंत बालिश आणि अज्ञानाचं प्रदर्शन करणारे होते. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून ही मुलाखत 2016 साली घेण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
काय विचारले प्रश्न फॉर्म्युला वन रेसिंग कारशी संबंधित प्रश्न विचारताना तिने या कारमध्ये किती व्यक्ती बसू शकतात, असा प्रश्न विचारला. त्यावर ही फॉर्म्युला वन कार असून त्यात एकच व्यक्ती बसू शकते, असं पाहुण्यांनी तिला उत्तर दिलं. मात्र या प्रश्नाने पाहुणेदेखील गोंधळले आणि त्यांना हसावं की रडावं तेच कळेनासं झालं. त्यानंतर तिने दुसरा प्रश्न विचारला. ती म्हणाली की सध्या एकच जण या कारमध्ये बसू शकतं, हे ठीक आहे. मात्र भविष्यात मोठी कार येईल, तेव्हा किती जण त्यात बसू शकतील. त्यानंतर तर पाहुण्यांना हसू आवरणं कठीण झालं. त्यांनी सांगितलं की फॉर्म्युला वनच्या कुठल्याही कारमध्ये एकच व्यक्ती बसू शकते. मात्र एवढी फजिती झाल्यावर तरी गप्प बसेल ती अँकर कसली. तिने तिसरा प्रश्नही विचारलाच. ती म्हणाली, हा नवा फॉर्म्युला तुम्ही डेव्हलप केला आहे, मात्र त्याची काही चाचणी वगैरे घेतली आहे की नाही. या प्रश्नावर निरुत्तर झालेल्या पाहुण्यांना तिने अखेरचा प्रश्न विचारला की या गाडीचा वेग काय असतो. या प्रश्नांमुळे अँकर चांगलीच ट्रोल झाली. हे वाचा - बापरे! 200 किलोचा वळू चढला दोन मजली घरावर, पाहा सुटकेचा थरारक VIDEO जुना व्हिडिओ हा व्हिडिओ खरं तर 2016 सालचा आहे. मात्र एका नेटिझन्सनं त्यातील एक क्लिप काढून सध्या सोशल मीडियावर टाकल्याने ही क्लिप जोरदार व्हायरल होत आहे. ही अँकर आणि तिने विचारलेले प्रश्न हा विषय सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडिंग आहे.