व्हायरल व्हिडीओ
मुंबई 05 जानेवारी : आपल्याला तर हे माहित आहे की पाकिस्तानी अर्थव्यवस्था ढबगाईला आली आहे. तेथे खूपच महागाई झाली आहे. ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सगळ्यात पाकिस्तानी सरकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो ऐकून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडीओमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आहे. जे ऐकून तुम्ही म्हणाल हे नक्की काय लॉजिक आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांना एक विचित्र वक्तव्य करताना पाहू शकता. त्यांनी म्हटलंय की, ‘‘ज्या देशात मार्केट रात्री ८ वाजता जेथे बंद होतं, तिथे मुलं होण्याची संख्या कमी आहे. पण तुमची एफिशियन्सी पाहा, रात्री १ वाजता मार्केट बंद होतं तरी देखील इतकी पॉप्यूलेशन आहे.’’ ख्वाजांचा हा तर्क कोणालाच कळत नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे आणि लोकांनी आपआपल्या परीने याचा तर्क लावण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडीओ Naila Inayat या पाकिस्तानी पत्रकाराने शेअर केला आणि त्यावर लिहिले की, ‘‘नवीन रिसर्च 8 वाजल्यानंतर बेबी जन्माला येऊ शकत नाही.’’ या ट्वीटवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. जर रक्षा मंत्री ख्वाजा यांच्या वाक्याचा शब्दशहा अर्थ काढायचा झाला तर, त्याचा अर्थ असा होतो की रात्री ८ वाजल्यानंतर मुलांना जन्माला घालण्याची प्रक्रिया केली जाऊ शकत नाही. लोकांनी या ट्वीटला उचलून धरलं आहे आणि रक्षामंत्री यांच्या या इलॉजिकल गोष्टींना उडवून लावत आहेत.
सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या या कमेंटने हैराण झाले आहेत. अनेकजण अजूनही या विधानामागील तर्क समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. इतर लोक या कल्पनेवर हसत आहेत. शिवाय मार्केट आणि बाळाचा संबंध काय? ख्वाजा मोहम्मद यांच्या या वाक्यांने सर्वांन आश्चर्य वाटले. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, “हे लोक संशोधनात खूप पुढे आहेत असे दिसते आहे! जगभरातील या विषयावर काम करणाऱ्या संस्थांनी या ‘संशोधनाला अंमलात आणावं, यामुळे पाकच्या संपूर्ण पेमेंट बॅलन्सची समस्या संपेल.
नक्की काय आहे हा प्रकार? पाकिस्तान सध्या वीज संकटाला सामोरं जात आहे. अशा परिस्थीतीत सरकारने निर्णय घेतला आहे की, देशातील बाजारपेठां व्यतिरिक्त लवकरच सर्व विवाह हॉल बंद केले जातील. जिथे बाजार साडेआठ वाजता बंद होईल आणि लग्नघरे १० वाजता बंद होतील. देशातील व्यावसायिकांना आता त्यांच्या व्यवसायाची चिंता लागली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मंगळवारी वीज बचत कमी करण्याच्या दिशेने एक मोठा निर्णय जाहीर केला. त्यात त्यांनी सांगितलं की, आता देशातील बाजारपेठा रात्री 8:30 वाजता बंद ठेवल्या जातील. ज्यामुळे वीज बचत होईल. मात्र पत्रकार परिषदेत ख्वाजा यांनी दिलेला युक्तिवाद खूपच आश्चर्यकारक आहे.
ख्वाजा आसिफ जेव्हा या निर्णयाबाबत सांगत होते तेव्हा ते म्हणाले की, आता लोकांनी आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन वीज बचतीसाठी प्रभावी ठरेल असा आराखडा तयार करण्यात आला आहे. ख्वाजा आसिफ म्हणाले की, जर हा उपाय लागू झाला तर देशाचे 62 अब्ज रुपयांची बचत होईल, यासोबतच 1 जुलैपासून इलेक्ट्रिक पंखे बनवणारे कारखानेही बंद होतील. ख्वाजा म्हणाले की, असे पंखे जे काम करत नाहीत ते 120 ते 130 वॅट्सच्या दरम्यान वीज वापरतात. जगभरात 60 ते 80 वॅटचे पंखे उपलब्ध आहेत.