JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'तो' एकटा आणि चारही बाजूंनी विषारी सापांनी घेरलं; जगातील सर्वात खतरनाक Snake Rescue Video

'तो' एकटा आणि चारही बाजूंनी विषारी सापांनी घेरलं; जगातील सर्वात खतरनाक Snake Rescue Video

सापांचा झुंड असलेल्या विहिरीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी एकटी व्यक्ती या विहिरीत उतरली.

जाहिरात

एकट्या माणसाने एकाच वेळी 6 सापांना केलं रेस्क्यू.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 27 ऑगस्ट : सापांच्या रेस्क्यूचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ तुम्हीही पाहिले असतील. साप पकडण्यात सर्पमित्र पटाईत असले तरी एका सापाला पकडतानाच त्यांची किती दमछाक होते ते तुम्ही पाहिलं असेल. अशावेळी एकाच वेळी सापांचा झुंड असेल आणि त्याला एकटी व्यक्ती पकडणार असेल तर… फक्त विचार करूनच तुम्हाला घाम फुटला ना. पण एका व्यक्तीने हे प्रत्यक्षात केलं आहे. एकट्या व्यक्ती सापांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घातला. विहिरीत पडलेल्या सापांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी त्याने विहिरीत उडी मारली. तो एकटा सापांची झुंड असलेल्या विहिरीत उतरला. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता एका कोरड्या विहिरीत बरेच साप आहेत. कोब्रा, अजगर असे खतरनाक आणि विषारी सापांचाही यात समावेश आहे. या सापांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी एकटी व्यक्ती या विहिरीत उतरते. हे वाचा -  तोंडात धरला हात आणि काही सेकंदातच व्यक्ती…; सापाच्या हल्ल्याचा भयानक VIDEO VIRAL दोरी आणि शिडीच्या मदतीने ही व्यक्ती विहिरीत जाते आणि मधोमध जाऊन उभी राहते. त्यानंतर चारही बांजूंनी साप त्याला घेरतात आणि त्याच्याकडे पाहत राहतात. आता एकटी व्यक्ती इतक्या सापांना कसं पकडणार हा सर्वात मोठा प्रश्न. ही व्यक्ती काही आता वाचत नाही असं तुम्हाला वाटेल, पण पुढे जे घडतं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

जेव्हा ही व्यक्ती सापांना पकडते तेव्हा साप त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतानाही दिसतात. पण तरी ही व्यक्ती घाबरत नाही.  एकेएक करत ही व्यक्ती सर्व सापांना पकडते आणि पिशवीत बंद करते. त्याने व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे एकूण ६ साप या विहिरीत होते आणि सहाही सापांना तो रेस्क्यू करतो. हे वाचा -  जेव्हा उंदीर आणि क्रिंग कोब्रा एकमेकांशी भिडतात, VIDEO पाहून उडेल थरकाप साप पकडणाऱ्या या व्यक्तीच नाव मुरलीवाला हौसला असं आहे. त्याने आपल्या यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. चॅनेलवर दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील हे दृश्य आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या