JOIN US
मराठी बातम्या / Viral / होणाऱ्या नवऱ्याचा कॉम्प्युटर उघडताच सरकली पायाखालची जमीन; तरुणीने ताबडतोब रद्द केलं लग्न

होणाऱ्या नवऱ्याचा कॉम्प्युटर उघडताच सरकली पायाखालची जमीन; तरुणीने ताबडतोब रद्द केलं लग्न

लग्नाला काही दिवस बाकी असताना तरुणीसमोर होणाऱ्या नवऱ्याचा सर्वात मोठा राज उलगडला.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 06 एप्रिल :  लग्न तुटल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. याची बरीच कारणं असतात. पण कधी कुणाचं कॉम्प्युटरमुळे लग्न तुटल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. एका तरुणीला लग्नाआधी तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या कॉम्प्युटरमध्ये असं काही दिसलं की तिने थेट आपलं लग्नच रद्द केलं. 25 वर्षांची मारिया. जिने आपल्या सोशल मीडियावर आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने नुकतंच टिकटॉक अकाऊंटवर आपाल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिने आपला साखरपुडा झाला होता आणि लग्नाला अवघे 3 महिनेच बाकी होते. पण त्याआधी होणाऱ्या नवऱ्याबाबत असं काही समजलं की तिने लग्नच तोडल्याचं सांगितलं. मारिया म्हणाली, माझा कॉम्प्युटर काम करत नव्हता. काही कामासाठी म्हणून मी माझ्या बॉयफ्रेंडचा कॉम्प्युटर ऑन केला. त्याच्या कॉम्प्युटरमध्ये जे दिसलं ते पाहून तिला धक्का बसला. हे वाचा -  कसं शक्य आहे! किडनी इन्फेक्शनवर उपचार करायला गेली महिला आणि अचानक जन्माला आलं बाळ द मिररच्या रिपोर्टनुसार मारियाला आपल्या बॉयफ्रेंडच्या कॉम्प्युटरमध्ये एक फोल्डर दिसलं. ते फोल्डर तिने उघडलं. तर त्यात अश्लील व्हिडीओ होते. इतकंच नव्हे तर तिच्या बहिणींचे आणि सहकाऱ्यांचे अश्लील फोटोही होते.  मारियाने यानंतर आपल्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी नातं तोडलं, लग्न रद्द केल्याचं सांगितलं. मारियाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बहुतेक युझर्सनी तिच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तिने जे केलं ते योग्यच केलं पण तिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत याबाबत स्पष्टपणे बोलायला हवं आणि त्याला धडा शिकवायला हवा, असा सल्लाही दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या