प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल
मुंबई 14 सप्टेंबर : असे अनेक लोक आहेत, ज्यांना प्रवास करताना विंडो सीटवर बसणं पसंत असतं. ज्यासाठी ते कधी जास्तीचे पैसे देतात, तर कधी वेगवेगळे प्रयत्न करतात. परंतू जास्तीचे पैसे देऊन देखील जर विंडो सीट मिळाली नाही तर? सहाजिकच राग येणं स्वाभाविक आहे. कतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे, जे सध्या खूप चर्चेत आहे. खरंतर या व्यक्तीने फ्लाइटमध्ये प्रवास करताना विंडो सीटचे जास्तीचे पैसे दिले. परंतू त्याला कंपनीने विंडो सीट दिलीच नाही. उलट त्याला अशी गोष्ट दिली जे पाहून तुम्हाला आणखी राग येईल. अलीकडेच ट्विटरवर @MartaVerse वापरकर्त्याने एक फोटो ट्विट करून एअरलाइन कंपनीकडे तक्रार केली. युजरचे म्हणणे आहे की, त्याने विंडो सीटसाठी पैसे दिले होते, परंतु असे असूनही त्याला ती सीट मिळाली नाही, तर त्याला दरवाजाजवळची सीट देण्यात आली. ज्यावर एक छोटी ओपनींग होती. त्या व्यक्तीने 10 सप्टेंबर रोजी हे ट्विट केले होते, जे तुफान व्हायरल झालं आहे. ज्यानंतर लोक या एअरलाईन्स कंपनीला देखील ट्रोल करु लागले आहेत. जेव्हा कंपनीने उत्तर दिले तेव्हा लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ही व्यक्ती युरोपियन एअरलाईन कंपनीच्या फ्लाइटने प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचा : लग्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या तरुणीला विमानतळावर थांबवताच समोर आलं धक्कादायक सत्य सोशल मीडियावर हे प्रकरण तापल्यानंतरही विमान कंपनीने त्या व्यक्तीची तक्रार गांभीर्याने घेतली नाही, तर गंमतीने हे प्रकरण टाळले, एवढेच नाही तर कंपनीने हा फोटो रिट्विट देखील केला आहे, ज्यामध्ये त्यांनी दरवाजाला बनवलेल्या छिद्रावर लाल वर्तुळ बनवले आहे, जे पाहाताना असे दिसते की ते असे म्हणत आहेत की दरवाजाला खिडकीसारखेच छिद्र आहे. तिच तुमच्यासाठी खिडकी आहे.
हे वाचा : Car मालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, दुरुस्त करताना गाडी सुरु झाली आणि… VIDEO व्हायरल कंपनीच्या अशा पोस्टमुळे लोकांचा संताप आणखी वाढला, ज्यामुळे लोक कंपनीला आणखी जास्त ट्रोल करु लागले. या फोटोवर लोकांच्या लाइक्स, कमेंट्स आणि व्ह्यूजची प्रक्रिया सातत्याने वाढत आहे. दरम्यान एका सोशल मीडिया वापरकर्त्यांनी विमान कंपनीला फटकारताना लिहिले की, एका व्यक्तीने सांगितले की, कंपनीच्या सोशल मीडिया कर्मचाऱ्यांना हा विनोद वाटत आहे. कुणाचे पैसे घेणे आणि सेवा न देणे हा विनोद नाही.