JOIN US
मराठी बातम्या / Viral / लसीकरण करताना बाळाला असं फसवलं... व्हिडीओ पाहून थांबनार नाही हसू

लसीकरण करताना बाळाला असं फसवलं... व्हिडीओ पाहून थांबनार नाही हसू

मुंबई 21 डिसेंबर : बऱ्याचदा सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे आपलं मनोरंजन करतात. तर काही व्हिडीओ हे आपल्या हृदयाला स्पर्श करुन जातात. म्हणूनच असे व्हिडीओ रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल हा व्हिडीओ एक लहान मुल आणि डॉक्टरशी संबंधीत आहे. जो खूपच सुंदर आहे. लहान मुलांना जन्म झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं लसीकरण केलं जातं, ज्यामुळे भविष्यात त्यांना वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण मिळेल.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 21 डिसेंबर : बऱ्याचदा सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे आपलं मनोरंजन करतात. तर काही व्हिडीओ हे आपल्या हृदयाला स्पर्श करुन जातात. म्हणूनच असे व्हिडीओ रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल हा व्हिडीओ एक लहान मुल आणि डॉक्टरशी संबंधीत आहे. जो खूपच सुंदर आहे. लहान मुलांना जन्म झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं लसीकरण केलं जातं, ज्यामुळे भविष्यात त्यांना वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण मिळेल. हे लसीकरण केल्यानंतर लहान बाळ फारच रडतात, पण ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असल्यामुळे त्यांना ते द्यावच लागतं. हे ही पाहा : जेव्हा झोपलेल्या वाघाजवळ पोहोचला कुत्रा, Video पाहून चुकेल काळजाचा ठोका लसीकरण केल्यानंतर काही बाळ इतके रडतात की त्यांना शांत करणे पालकांसाठी कठीण होतं, पण या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील बाळ लस घेताना रडलाच नाही. हो, पण यामध्ये खरी कमाल आहे ती त्या डॉक्टरची. बाळाला लसीकरण देणाऱ्या या डॉक्टरने ज्यापद्धतीने बाळाला लस दिली, ते खूपच मजेदार आणि कौतुकास्पद आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही या डॉक्टरचं कौतुक केल्याशिवाय राहाणार नाही. हा डॉक्टर या बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून दाखवतो, शिवाय तो त्याच्याजवळ असलेले खिळणं देखील बाळाला दाखावतो आणि त्यांला या सगळ्यात दंग करुन ठेवतो.

जेव्हा बाळाचं लक्ष खेळण्यात असतं तेव्हाच हा डॉक्टर लस काढतो आणि हळूच बाळाला देतो. यावेळा बाळाला थोडंसं जाणवतं आणि तो रडणारच असतो, पण तोपर्यंत लगेच डॉक्टर पुन्हा बाळाला सगळं विसरायला भाग पाडतो आणि लस घेतल्यानंतर देखील हे बाळ हसू लागतं.

हा एखादा चमत्कारच झाला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण लस घेतल्यावर तासनतास रडणारे बाळा जराही रडले नाही, हे आश्चर्यकारक नाही का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या