मुंबई, 09 ऑगस्ट : सोशल मीडियावर प्राण्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कधी खेळताना तर कधी मदत करताना तर कधी लढाई, खोट्या काढताना. पण यासगळ्यात सध्या चर्चा सुरू आहे ती माकडांची. याचं कारणही तितकच खास आहे. दोन माकडांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या दोन माकडांचे भन्नाट व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये माकडाला एक माणूस गिफ्ट देतो. हे गिफ्ट पाहून माकड खूश होतं आणि ते काय आहे याची उत्सुकता म्हणून उघडून पाहातं. आतामध्ये पाण्याची बाटली असते. आधी ती बाटली उघडून माकड पाहातो. मग बाटलीचा वास घेतं आणि झाकण लावून पुन्हा ठेवतं. त्यानंतर त्या बटलीसोबत आलेलं ब्रोशर वाचतं. अगदी एखाद्या माणसानं वाचावं तशा आर्विभावात हे माकड वाचत असल्यानं सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा होत आहे.
या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान लाईक्स मिळाल्या आहेत. 1.1 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. साडेसात हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे वाचा- VIDEO: आता तर हद्दच झाली! एका VIDEO साठी कुत्र्याला गरगर फिरवून दिलं फेकून
दुसरा व्हिडीओ हा माकड ध्यान करत असल्याचा आहे. माणसासारखंच अगदी बसून त्यानं ध्यान धारणा केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ साडेपाच हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. याशिवाय 100 हून अधिक लोकांनी शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी या दोन्ही व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.