JOIN US
मराठी बातम्या / Viral / Mobile Shop Fire : मुंबईतील मोबाईल शॉप आगीच्या विळख्यात, 4-5 दुकानं खाक; दुर्घटनेचा VIDEO

Mobile Shop Fire : मुंबईतील मोबाईल शॉप आगीच्या विळख्यात, 4-5 दुकानं खाक; दुर्घटनेचा VIDEO

मोबाईल दुकानांना लागलेल्या आगीचा व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात

मोबाईल दुकानांना आग

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑक्टोबर : मोबाईल ब्लास्ट झाला, मोबाईलला आग लागली अशी काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण नुकतीच मोबाईल दुकानच पेटल्याची घटना घडली आहे. नालासोपारामध्ये मोबाईल दुकानांना आग लागली आहे. जवळपास 4 ते 5 दुकानं आगीत जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील जाधव मार्केटमधील ही धक्कादायक घटना आहे. मोबाईल दुकानांना आग लागली. 4 ते 5 दुकानं आगीत खाक झाली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने दुकानं आगीच्या विळख्यात आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशनम दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे वाचा -  आगीशी खेळ अंगाशी आला, फुंक मारताच तरुण पेटला; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO सुदैवाने या दुर्घटनेत कुणाला काही झालं नाही. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

संबंधित बातम्या

आग लागल्याच्या अशा दुर्घटना कधी, कुठे घडू शकतात सांगू शकत नाहीत. त्यामुळे अशी दुर्घटना झाल्यास नेमकं काय करायचे हे तुम्हाला माहिती असायला हवं. आग लागल्यानंतर आपण काय करायचं ते पाहुयात. आग लागल्यावर काय करायचं? आग लागल्यास आगीतून ज्वलनशील पदार्थ ताबडतोब काढून टाकावेत, अन्यथा आग पसरून नुकसान अधिक होऊ शकते. आग लागताच पाण्याने विझवली पाहिजे, परंतु त्यापूर्वी अग्निशामक यंत्रणेला माहिती द्यावी. ऑक्सिजनचा पुरवठा बंद करूनही आग थांबवता येते. पेट्रोल आणि डिझेलमुळे लागलेली आग वाळूने विझवता येते. तुमच्या कपड्यांना आग लागली तर धावू नका. कारण त्यामुळे आग वाढेल.  अशा परिस्थितीत जमिनीवर झोपा आणि जमिनीवर उलट सुलट ह्योऊन आग विझविण्याचा प्रयत्न करा. घरात आग लागल्यावर अंगावर ब्लँकेट घेऊन घराबाहेर पडा. हे वाचा -  बापरे! केसांसह तरुणही पेटला; Fire Hair Cut करताना भडकली आग; Shocking Video सर्वांना आगीबाबत सावध राहून इतरांनाही सावध केले पाहिजे. त्यामुळे आपल्यासह इतरांचेही प्राण वाचू शकतात आणि इतर नुकसानही टाळले जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या