JOIN US
मराठी बातम्या / Viral / बँकेत टाकला सशस्त्र दरोडा, पण पैसे-सोन्याऐवजी असं काही लुटलं की...; VIDEO तुफान VIRAL

बँकेत टाकला सशस्त्र दरोडा, पण पैसे-सोन्याऐवजी असं काही लुटलं की...; VIDEO तुफान VIRAL

लखनऊ, 27 सप्टेंबर : चोरी, दरोडा याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुठे रस्त्याने चालता फिरता डल्ला मारला, कुठे दुकान फोडलं, कुठे बँक लुटली अशी एक ना दोन कितीतरी प्रकरणं आहेत. आता बँकेत चोरी किंवा दरोडा म्हटला की तो पैसे किंवा दागिने लुटण्यासाठी. पण सध्या बँकेतील दरोड्याचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. कारण बँकेत येऊन दरोडेखोरांनी पैसे किंवा दागिने नाही तर वेगळ्याच गोष्टीची लूट केली आहे.

जाहिरात

बँकेतील दरोड्याचा व्हिडीओ.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 27 सप्टेंबर : चोरी, दरोडा याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुठे रस्त्याने चालता फिरता डल्ला मारला, कुठे दुकान फोडलं, कुठे बँक लुटली अशी एक ना दोन कितीतरी प्रकरणं आहेत. आता बँकेत चोरी किंवा दरोडा म्हटला की तो पैसे किंवा दागिने लुटण्यासाठी. पण सध्या बँकेतील दरोड्याचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. कारण बँकेत येऊन दरोडेखोरांनी पैसे किंवा दागिने नाही तर वेगळ्याच गोष्टीची लूट केली आहे. एका बँकेतील दरोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सशस्त्र दरोडेखोर बँकेत आले. पण बँकेतील ही सामान्यपणे होणाऱ्या लुटीपेक्षा वेगळी आहे. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. नेमकं असं या बँकेत काय लुटण्यात आलं तुम्हीच पाहा. हे वाचा -  बाईक चोरण्यात यश आले नाही म्हणून रागावलेल्या चोराचं विचित्र कृत्य! पाहा Viral Video व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला बँकेच्या सुविधा केंद्रावर दोन कर्मचारी काम करत असल्याचे दिसतात. त्याचवेल अचानक 3 व्यक्ती बँकेत घुसतात. सुरुवातीला बँक कर्मचाऱ्यांना ते मारहाण करतात. त्यानंतर त्यापैकी एक आपल्याजवळी बंदूक बाहेर काढतो. बंदुकीचा धाक दाखवत एका कर्मचाऱ्याजवळी मोबाईल हिसकावून घेतो. मोबाईलपर्यंत ठिक आहे. पण नंतर तो इंटरनेट राऊटवरही घेतो आणि काही कॅश घेऊन तिथून फरार होतात. सामान्यपणे बँकेत पैशांसाठी दरोडा घातला जातो पण बँकेत इंटनेरट राऊटरची चोरी ना तुम्ही कधी पाहिली असेल, ना कधी ऐकली असेल. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

संबंधित बातम्या

ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील असल्याचं सांगितलं जातं आहे.  25 सप्टेंबरला घडलेली ही घटना आहे. @CitizenKamran नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये घटनेबाबत माहितीही देण्यात आली आहे. हे वाचा -  या’ तरुणापासून सावधान! स्वतःला म्हणतो इंजिनीअर, इमोशनल स्टोरी सांगून जाळ्यात ओढतो आणि… दरम्यान रिपोर्टनुसार बँक सुविधा केंद्र संचालकानी जवळील पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलीस तपास करत आहेत. आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या