JOIN US
मराठी बातम्या / Viral / बिस्किटांचं आमिष देत अल्पवयीन मुलाला हॉस्पिटलमध्येच करायला लावलं धक्कादायक कृत्य; संतापजनक VIDEO

बिस्किटांचं आमिष देत अल्पवयीन मुलाला हॉस्पिटलमध्येच करायला लावलं धक्कादायक कृत्य; संतापजनक VIDEO

अल्पवयीन मुलाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णायात जे करायला लावलं ते पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

जाहिरात

रुग्णालयातील कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलाला करायला लावलं धक्कादायक काम.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 07 सप्टेंबर : चॉकलेट्स, बिस्किट किंवा इतर खाऊचं आमिष देत मुलांना आपल्या जाळ्यात खेचल्याच्या काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. मुलांना असं आमिष दाखवत कुणी बलात्कार, कुणी अपहरण करतं. असे एक ना दोन किती तरी गुन्हेगारीची प्रकरणं आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका अल्पवयीन मुलाला बिस्किटाचं आमिष देऊन रुगणालयातच धक्कादायक कृत्य करायला लावलं आहे. हा व्हिडीओ पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशमधील सकारी रुग्णालयातील ही संतापजनक घटना आहे. रुग्णालयाचा हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन पुरुष आणि एक महिला असे एकत्र एका ठिकाणी खुर्चीवर बसलेले दिसतात. त्यांच्यासोबत एक लहान मुलगाही दिसतो आहे. पण हा मुलगा जमिनीवर बसला आहे. खुर्चीत बसलेल्या एका व्यक्तीचे तो पाय दाबतो आहे. तर ती व्यक्ती आणि त्याच्यासोबत असणारी महिला त्याच्याशी बोलताना दिसत आहे. हे वाचा -  फक्त 1000 रुपयांसाठी Ambulance driver चं Pregnant महिलेसोबत धक्कादायक कृत्य; संतापजनक VIDEO @akhileshjais29 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टनुसार शहडोल जिल्ह्यातील ब्यौहारी सिव्हिल हॉस्पिटलमधील हे दृश्य आहे. या मुलाला बिस्किटाचं आमिष देण्यात आलं आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्याच्याकडून आपल्या पायांचा मसाज करून घेतला.

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलाकडून पायांचा मसाज करवून घेणाऱ्या या हॉस्पिटल कर्मचाऱ्याचं नाव महेंद्र बायस असल्याचं सांगितलं जातं आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. मंगळवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.  पीटीआयच्या वृत्तानुसार हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आरोग्य प्रशासानाने या कर्मचाऱ्याला बुधवारी कारणे दाखवा नोटिस पाठवली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे वाचा -  भयंकर! कानाखाली मारली म्हणून रागात छातीवर झाडली गोळी; हत्येचा थरारक LIVE VIDEO पीटीआय शी बोलताना बिओहरीतील वैद्यकीय अधिकारी निशांत सिंह म्हणाले, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्ही बायसला कारणे दाखवा नोटिस पाठवली आहे. तर मुख्य वैद्यकीय आणि आरोगय अधिकारी आर. ए, पांडे यांनी बायसने या नोटिसीला उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या