JOIN US
मराठी बातम्या / Viral / नियमांची ‘ऐशी तैशी'! भररस्त्यात बंदूक घेऊन तरुणांनी केला डिस्को, VIDEO VIRAL

नियमांची ‘ऐशी तैशी'! भररस्त्यात बंदूक घेऊन तरुणांनी केला डिस्को, VIDEO VIRAL

बिहारमध्ये नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार हे सतत घडत असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुझफ्फरपूर, 01 डिसेंबर : बिहारमध्ये नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार हे सतत घडत असतात. असाच एक प्रकार बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये घडला. या कार्यक्रमात भररस्त्यात तरुणांनी हातात बंदूका घेऊन धुमशान घातला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणांचा तपास सुरू केला आहे. वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक भररस्त्यात हातात बंदूक घेऊन डिस्को करताना दिसत आहेत. एएनआयच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण मुजफ्फरपूरच्या अहियापूर भागातील आहे. येथील नृत्य कार्यक्रमादरम्यान काही लोक नियमांना धाब्यावर मारत भररस्त्यात गोळीबार करत होते. या व्हिडिओमध्ये 4 ते 5 तरुण हातात एक-एक बंदूक घेऊन नाचताना दिसत आहेत. मात्र, जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा खळबळ उडाली आणि पोलिस काय झोपा काढत आहेत का, असा सवाल विचारण्यास सुरुवात झाली. दरम्यान आता पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वाचा- वेब सीरिजमध्ये श्वेता तिवारीचा BOLD अवतार, सोशल मीडियावर Video Viral

वाचा- कार्तिक आर्यनला पकडावे लागले दीपिकाचे पाय, असं झालं तरी काय; पाहा VIDEO हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक राम नरेश पासवान यांनी, “आम्ही आधी व्हिडिओ पाहू त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली जाईल”, असे सांगितले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यापूर्वी असेच आणखी एक प्रकरण मुजफ्फरपुरात समोर आले होते. कटरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही मुली स्टेजवर नाचत असताना काही तरुण शस्त्रे घेऊन स्टेजवर पोहोचले आणि त्यांनी हवेत गोळीबार सुरू केला. दरम्यान, या सगळ्या प्रकारात कोणताही अपघात झाला नाही. मात्र असे असले तरी,या घटनेने स्थानिक प्रशासनाच्या सक्रियतेवरही मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. वाचा- प्रसिध्द टीव्ही अभिनेत्यानं शाळेतच बनवला होता SEX VIDEO, स्वत:चं सांगितला किस्सा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या