JOIN US
मराठी बातम्या / Viral / म्हणे, 'कृपा करून...'; बड्या उद्योगपतीने शेअर केलेली Matrimonial Ad सोशल मीडियावर तुफान Viral

म्हणे, 'कृपा करून...'; बड्या उद्योगपतीने शेअर केलेली Matrimonial Ad सोशल मीडियावर तुफान Viral

लग्नाच्या जाहिरातीत असं काही म्हटलं आहे, ज्यामुळे ही जाहिरात सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होते आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर : लग्नासाठी वृत्तपत्रात जाहिराती दिल्या जातात. ज्यात आपल्याला अपेक्षित असलेल्या स्थळाचा शोध घेतला जातो. ज्यात आपली माहिती आणि आपल्याला कसा जोडीदार हवा आहे ते सांगितलं जातं. अशाच जाहिरातींपैकी एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. एका बड्या उद्योगपतीने ही लग्नाची जाहिरात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. असं या जाहिरातीत नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. उद्योगपती समीर अरोराने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही जाहिरात पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या जाहिरातीत तुम्ही पाहाल तर म्हटलं आहे, गोरी, सुंदर आणि श्रीमंत घरातील तरुणीसाठी आयएएस, आयपीएस, उद्योगपती, व्यावसायिक किंवा डॉक्टर नवरा हवा आहे. जो सजातीय असेल. हे वाचा -  प्रेम काय असतं…; महिला IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Romantic video तुफान व्हायरल आता यात तुम्हाला तसं वावगं काही दिसणार नाही. अशा अपेक्षा सर्वसामान्यपणे अनेकांच्या असतात. त्यामुळे इथपर्यंत सर्व ठिक आहे. पण या जाहिरीतीत पुढे जे दिलं आहे, ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल. शेवटी या जाहिरातीत म्हटलं आहे, कृपया सॉफ्टवेअर इंजिनीअर फोन करू नका. आधी मला डॉक्टर, इंजिनीअर नवरा हवा… अशी अपेक्षा कित्येक तरुणी आणि त्यांच्या आईवडिलांची असायची. तेव्हा इंजिनीअर्स खूप कमी प्रमाणात असायचे. पण आता बरेच इंजिनीअर्स आहेत. पण या जाहिरातीत मात्र इंजिनीअर नवरा नको असं स्पष्टपणे नमूद केलं आहे.

संबंधित बातम्या

ही जाहिरात नेमकी कधीची आणि कुठली आहे माहिती नाही. पण समीर अरोरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही जाहिरात पोस्ट करताना आयआयटीचं भविष्य फार चांगलं दिसत नसल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युझरने ही जाहिरात पाहिल्यानंतर संपूर्ण देशाचं भविष्य ठिक दिसत नसल्याचं म्हटलं आहे. तर एका युझरने इंजिनीअर्स वृत्तपत्राच्या जाहिरातीवर विश्वास करत नाहीत, स्वतःच शोधतात असं म्हटलं आहे. हे वाचा -  स्टाफने दीड तासांत केली अशी गोष्ट की बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, नेमकं काय आहे प्रकरण? तुम्हाला ही जाहिरात पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या