JOIN US
मराठी बातम्या / Viral / मोठ्या तोऱ्यात एकाच मंडपात एकाच वेळी 9 बायकांशी केलं लग्न; महिनाभरातच...

मोठ्या तोऱ्यात एकाच मंडपात एकाच वेळी 9 बायकांशी केलं लग्न; महिनाभरातच...

9 महिलांशी लग्न करणाऱ्या त्या व्यक्तीने आता आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्राझिलिया, 26 एप्रिल : एखाद्या व्यक्तीच्या दोन बायका असतील तर त्याची काय अवस्था होते हे काही वेगळं सांगायला नको. मग एखाद्याने एकाच वेळी 9 महिलांशी लग्न केलं असेल तर त्याचं काय झालं असेल याचा विचार तुम्ही केला आहे. 9 महिलांशी लग्न करून चर्चेत आलेली अशीच एक व्यक्ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. त्याचं कारण आहे ते त्याचं वैवाहिक आयुष्य (Man married with 9 wives). ब्राझीलमध्ये राहणारा आर्थर ओ उर्सो ज्याने गेल्या वर्षी नऊ महिलांशी लग्न केलं होतं. त्याच्या या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. कित्येक पुरुषांना आपलीही लाइफही आर्थरसारखी असावी असं वाटू लागलं. पण त्याच आर्थरच्या आयुष्यात असं काही खळबळजनक घडलं आहे की अशी आपण किती सुखी आहोत, याचं समाधान या पुरुषांना वाटेल. एकापेक्षा जास्त पत्नी ठेवण्याची इच्छा किंवा हौस असणाऱ्या पुरुषांसाठी आर्थरने नवा शॉकिंग खुलासा केला आहे. हे वाचा -  ‘फोन, लहान मुलं बॅन आणि…’, पाहुण्यांसाठी नवरीच्या विचित्र अटी; वाचून म्हणाल, ‘असं लग्न नको गं बाई’ आर्थरने सांगितलं की, प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आहे. त्यांना एकत्र आनंदी ठेवण्यासाठी त्याने लग्नानंतर एक बेडरूम रुटिन बनवलं. आपल्या पार्टनरला एकटं वाटू नये, यासाठी त्याचा प्रयत्न असतो. पण आता आर्थर स्वतःच आपल्या रूटिनला कंटाळला आहे. रूटिननुसार तो दरगदिवशी आपल्या वेगवेगळ्या बायकोला वेळ देतो पण कित्येक वेळा तो एकीसोबत असतो आणि दुसरीबाबतच विचार करत असतो. हे खूप त्रासदायक होतं. त्याला रोमान्स आता गरजेपेक्षा ओझं वाटू लागलं आहे. आर्थरने म्हणाला, त्याच्या 9 पत्नींपैकी एक त्याच्यापासून वेगळी झाली. तिला एकटीला तो हवा होता. पण आपल्या इतर पत्नींचा विचार करून त्याने तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लवकरच दोघं घटस्फोटही घेणार आहेत. यामुळे त्याला खूप दुःख झालं आहे पण त्याला आपल्या बाकी पत्नींसोबत वेळ घालावावा लागतो आहे. हे वाचा -  ‘फोनवर इतर कुणाशी का बोलते?’, GF ने दिलं असं सॉलिड उत्तर; BF आयुष्यात चुकूनही पुन्हा विचारणार नाही प्रश्न आर्थर आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नाही. त्याच्या पत्नी एकमेकींचा द्वेष करू लागल्या आहेत, ज्यामुळे ही समस्या सुरू झाली आहे, असं त्याने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या