JOIN US
मराठी बातम्या / Viral / लॉकडाऊनमध्ये नशीब काढलं बॉस! घरबसल्या एका मिनिटांत असे जिंकले 15 कोटी

लॉकडाऊनमध्ये नशीब काढलं बॉस! घरबसल्या एका मिनिटांत असे जिंकले 15 कोटी

याला म्हणतात खरं नशीब, लॉकडाऊनमध्ये हा अवलिया असा झाला कोट्यावधींचा मालक.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलोरॅडो, 01 मे : नशीब कधीकधी असे खेळं करतो की आपल्याला अपेक्षितही नसतं असे प्रकार घडतात. अमेरिकेतही एका इसमासोबत असाच काहीसा प्रकार घडला. एका लॉटरीच्या तिकिटानं घरबसल्या त्याचं नशीब पालटलं. या इसमानं 2 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 15 कोटींच्या लॉटरीचे तिकिट विकत घेतले होते. आश्चर्याची बाब म्हणजे या पठ्ठ्यानं दोन्ही लॉटरी जिंकल्या आणि तब्बल 15 कोटींचा मालक झाला. कोलोरॅडोमध्ये राहणारा हा इसम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. यासाठी कारण एकीकडे घरात बसून काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यामुळं खाण्य़ासाठी पैसे नाही आहे. अशा परिस्थितीत हा पठ्ठ्या चक्क 15 कोटींचा मालक झाला आहे. मुख्य म्हणजे गेली 30 वर्ष हा इसम फक्त लॉटरी विकत घेण्याचे आणि आपले नशीब आजमवण्याचं काम करतो. या इसमाचं नाव जोई आहे. वाचा- VIDEO : महिलेच्या कानात घुसला कोळी, काही दिवसांनंतर अशी झाली होती अवस्था जोई यांना लागलेल्या या लॉटरी कंपनीचे मॅनेजर मेघन डोगर्टी यांनी जोईनं 2 लॉटरीचे तिकिट घेतल्याचे सांगितले. त्यासाठी जोई दीड किमी अंतर चालत गेला होता. पहिले तिकिट त्यांनी सकाळी घेतले तर दुसरे संध्याकाळी. थोड्या वेळानं त्यांना लॉटरी कंपनीतून 15 कोटीं जिंकल्याचा फोन आला. वाचा- शीखांनी लाखो लोकांना केली मदत, तर अमेरिकन पोलिसांनी असे मानले आभार

वाचा- लॉकडाऊनमुळे गंगा इतकी स्वच्छ झाली की दिसले डॉल्फिन? वाचा VIRAL VIDEO मागचं सत्य दरम्यान लॉकडाऊनमुळं जोई यांना पैसे ऑनलाईन दिले जाणार आहे. पण जोई यांच्या संयमाला मानलं पाहिले गेली 30 वर्ष ते लॉटरीचे तिकिट विकत घेते, मात्र त्यांना यश आले नाही. आता लॉकडाऊनमध्ये त्यांना 15 कोटींची लॉटरी लागली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या