JOIN US
मराठी बातम्या / Viral / मंदिरात चोरी करायला गेला चोर; समोर देव दिसताच जे केलं ते पाहून चक्रावून जाल, VIDEO

मंदिरात चोरी करायला गेला चोर; समोर देव दिसताच जे केलं ते पाहून चक्रावून जाल, VIDEO

चोराने मंदिरात चोरी करण्याआधी हात जोडून देवाचा आशिर्वाद घेतला. यानंतर त्याने मंदिरातील अष्ठधातूच्या मूर्ती आणि दानपेटीचं कुलूप तोडून त्यातील दोन लाख रुपये लंपास केले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 04 डिसेंबर : चोरीची एक अजब घटना मध्य प्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यातील जैन मंदिरातून समोर आली आहे. इथे चोरी करण्यापूर्वी चोराने जे काही केलं, ते पाहून सगळेच थक्क झाले. या चोराने मंदिरात चोरी करण्याआधी हात जोडून देवाचा आशिर्वाद घेतला. यानंतर त्याने मंदिरातील अष्ठधातूच्या मूर्ती आणि दानपेटीचं कुलूप तोडून त्यातील दोन लाख रुपये लंपास केले. चोरीची ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ‘मला थोडी दारू प्यायला द्या’; वडिलांकडे हट्ट करणाऱ्या मुलाचा Video होतोय व्हायरल जिल्ह्यातील परिहार ठाण्याच्या परिसरात पनिहार गावात एक प्रसिद्ध जैन मंदिर आहे. एका चोराने या मंदिरातच डल्ला मारला. मात्र, चोरी करण्याआधी या चोराने जे काही केलं त्याचीच जास्त चर्चा रंगली आहे. या चोराने अष्ठधातूच्या मूर्ती आणि दानपेटीतील 2 लाख रुपये लंपास केले आहेत. मंदिरातील किमती सामान घेऊन तो चोर फरार झाला.

संबंधित बातम्या

या चोराने अवघ्या 10 मिनिटात मंदिरातील दानपेटीत असलेले 2 लाख रुपये चोरी केले. यासोबत तो अष्ठधातूच्या सहा मूर्तीही घेऊन गेला. सकाळी जेव्हा पुजारी पूजा करण्यासाठी मंदिरात गेले तेव्हा त्यांना दानपेटीचं कुलूप तुटलं असल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच मूर्त्याही गायब होत्या. यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. यामध्ये चोरीची संपूर्ण घटना कैद झालेली दिसली. पतीला सोडून बहिणीसोबत हनिमूनला गेली नवरी; संपूर्ण सत्य समजताच नवरदेवाची पोलिसांत धाव घटनेची माहिती मिळताच परिहार ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोराला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच चोराला अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या