JOIN US
मराठी बातम्या / Viral / जिवंत सापाला गळ्यात गुंडाळून अगदी स्टाईलमध्ये काढला Selfie; पण पुढच्याच क्षणी...

जिवंत सापाला गळ्यात गुंडाळून अगदी स्टाईलमध्ये काढला Selfie; पण पुढच्याच क्षणी...

सापासोबत सेल्फी घेण्याची हौस तरुणाला महागात पडली.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 27 जानेवारी :  सेल्फी घ्यायला कुणाला आवडत नाही. काही जणांना तर सेल्फी घेण्याची इतकी हौस असते की कधीही, कुठेही आणि कुणासोबतही सेल्फी घेतात. पण असा सेल्फी काही वेळा जीवावरही बेततो. असंच घडलं ते आंध्र प्रदेशच्या एका व्यक्तीसोबत. या व्यक्तीने चक्क जिवंत सापासोबत सेल्फी घेण्याची डेअरिंग केली. पण त्यानंतर त्याच्यासोबत भयंकर घडलं. पोत्तिसिरामुलु नेल्लोर जिल्ह्यातील  कंडुकुरमधील ही घटना. इथं ज्युसचं दुकान चालवणारा मणिकांत रेड्डी. ज्याने सापा सोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. एक गारूडी सापासोबत खेळत होता. मणिकांत तिथं गेला. त्याने गारूड्याकडून साप घेतला आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. सेल्फीसाठी त्याने त्या सापाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळलं. त्याच्यासोबत सेल्फी घेतला, फोटोही आला. त्यानंतर सापाला तो आपल्या गळ्यातून काढायला गेला आणि सापाने आपला रंग दाखवला. हे वाचा -  चक्क सापाला KISS करायला गेला तरुण; असा चावला की… थरकाप उडवणारा VIDEO व्यक्ती सापाला गळ्यातून काढत असताना सापाने आपला फणा बाहेर काढला आणि त्या व्यक्तीला दंश केला. तिथल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण रुग्णालयात पोहोचण्याआधी रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. सापासोबत सेल्फीच्या नादात त्याने आपला लाखमोलाचा जीव गमावला.

सापासोबत खेळ असा भारी पडू शकतो. साप चावल्यानंतर काही मिनिटांतच मृत्यू होऊ शकतो. हे माहिती असतानाही काही लोक मजा म्हणून सापाला पकडतात आणि त्याच्यासोबत खेळतात. जे या तरुणानेही केलं. पण त्याने जी चूक केली ती तुम्ही करू नका. नाहीतर उद्या या तरुणाच्या जागी तुम्ही असाल. हे वाचा -  बापरे बाप! तरुणीचं चक्क अजगरासोबत डेटिंग; हॉटेलमध्ये गेले आणि… Shocking Video Viral

याआधी 2017 साली महाराष्ट्रातही असंच घडलं होतं. नवी मुंबईतल्या बेलापूरच्या सोमनाथ म्हात्रे या सर्पमित्राने सापासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. 30 जानेवारीला सोमनाथनं एक साप पकडला होता. या सापासोबत तो सेल्फी काढायला गेला. पण सापानं डाव साधत त्याच्या छातीला चावा घेतला. सोमनाथला त्यानंतर तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पण उपचार सुरु असताना दोन फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला. सोमनाथ हा सर्पमित्र होता त्यानं शेकडो सापांना जीवदान दिलं होतं. पण त्यानं सापासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि तो जिवाला मुकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या